top of page

     भारतीय हवामानशास्ञ विभागाची स्थापना 1875 साली झाली. हा विभाग देशाची राष्ट्रीय हवामानशास्ञीय सेवा असून हवामानशास्ञ, यात पाऊस रोजची हवेची स्थिती, रोजचे तापमान ,आर्दता, वा-याचा वेग, इत्यादी    संबंधित विषयांशी  विषयांशी निगडित  माहिती प्रसारीत करते . महाराष्ट्तील हवामानदर्शक  वेघशाळा  म्हणजे  मुंबई  कुलाबा येथील वेघशाळा, पुणे येथील सिमला कार्यालय हि वेधशाळा अशा काही वेधशाळा महाराष्ट्च्‍या इतर विभागत पण आहेत. या हवामानशास्ञ    विभागाची मुख्य कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.

1) हवामान शास्त्रीय निरीक्षण करणे आणि सद्य व भविष्यातील हवामानशास्त्रीय माहिती पुरविणे ज्याचा उपयोग शेती सिंचन, जहाजात माल भरणे, विमानचालन इ. गोष्टींसाठी होतो.

2) जीवित व वित हानी करणा-या तीव्र हवामान घटक जसे वादळे, चक्ररीवादळ, धुळीचे वादळ मुसळधार पाउस आणि बर्फ, थंड व उष्ण लहरी, इत्यादीबाबत सूचना व सल्ले देणे.

3) शेती, पाण्याचे व्यवस्थापन, उद्योग आणि इतर राष्ट्रीय क्रियांसाठी लागणारही हवामानशास्त्रीय आकडेवारी पुरविणे

4) हवामानशास्त्र आणि संबंधित विद्याशाखांमध्ये संशोधन करणे व त्यास प्रोत्सहान देणे.

5) विकास प्रकल्पांसाठी भूकंप शोधून देशातील विविध भागात भूकंपशीलतेचे मुल्यांकन करणे.

6) दिर्घकालीन प्रमाणीकृत हवामानशास्त्रीय नोंदी सांभाळणे

7) संशोधन आणि राष्ट्रीय निर्माण क्रियांसाठी माहिती पुरविणे

8) राष्ट्रीय आर्थिक प्रगतीसाठी दक्षिणपश्चिम मान्सूनचा अंदाज लावणे

9) शेतक-यांना पिकांचे नमुने व मान्सूनला सामोरे जाण्यासाठी सल्ल देणे

10) हवामानशास्त्रीय उपकरणे स्थापित करणे व त्यांची देखभाल करणे

11) देशातील हवामान परिस्थितीचा रोजच्यारोज अंदाज लावणे.

हवामान दर्शक नकाशाची माहिती

हवामान नकाशे पृथ्वीच्या किंवा तयाच्या एका भागात हवामान घटना दर्शवतात. हवामान नकाशे तापमान, पर्जन्य, सूर्यप्रकाश, ढगाळ वातावरण वा-याची दिशा आणि वेग, इ हवामान घटकांशी संबंधित विशिष्ट दिवसांची परिस्थिती दर्शवतात. निश्चिम तासाला केलेली निरीक्षणे संकेतांव्दारे पूर्वानूमान केंद्रांकडे वेधशाळेला दिवसातून दोनदा प्रसारित करते. भारतीय समुद्रांवर येजा करणा-या जहाजांवरूनही माहिती गोळा करता येते.

अंटाक्र्टिक मध्ये हवामान वेधशाळा, आंतराष्ट्रीय भारतीय महासागर मोहीम आणि रॉकेट व हवामान उपग्रह सुरू झाल्यापासून हवामान अनुमान आणि निरीक्षणाच्या क्षेत्रात चांगली प्रगती झालेली दिसून येते आहे.

उपयुक्त माहिती

  1. कमाल व किमान तापमान (से.)अंश सेल्सिअस व फॅरानाईट मध्ये मोजतात. (उपयोग – उच्चतम व निम्म्तम तापमापकाव्दारे जास्तीत जासत व कमीत कमी दैनिक तापमानप समजते.) ( तत्व – पारा व अल्कोहाल तापमानातील बदला नुसार सम प्रमाणात प्रसरण किंवा अंकूचन पावतात.

  2. कोरडया व ओल्या फुग्याचा तापमापक  - आर्द्रता टक्केवारीत मोजता (उपयोग वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. )

  3. पर्यज्य मापक – पर्जन्य से.मी. तसेच मि.मि मध्ये किंवा इंचा मध्ये मोजतात. (उपयोग – पर्जन्य मोजण्यासाठी याचा उपयोग होतो.)

  4. वायुवेगमापक – वा-याचा वेग नॉट्रस या परीणामात  मोजतात (या परीणामाचा उपयोग वा-याचा वेग मोजण्यासाठी होतो.)

  5. हवेचा दाब मिलीबार या परीणामात मोजतात

  6. साधा तापमापक- तापमान सें.ग्रे. किंवा फॉरेनाईट मध्ये मोजतात (याचा उपयोग दैनंदीन तापमान मोजण्यासाठी होतो. )

bottom of page