top of page

हवामान दर्शक नकाशा वाचन करीत असताना…….

            हवामान दर्शक नकाशा वाचन करीत असताना सर्व प्रथम  नकाशा कोणत्या तारखेचा किंवा नकाशा कोणतया वर्षाचा आहे ते पहाणे नकाशाचा महिना लक्षात घेता नकाशातील सर्वसाधारण हवामानाचा अंदाज आपणांस येतो . या नकाशाच्या तारखेच्या बाजूस IDWR असे म्हटलेले असते याचा अर्थ   Indian Daily Weather Report असा होतो. सदरच्या नकाशात विविध प्रदेशातील तापमान दर्शविलेले असते हे तापमान समताप रेषांनी जोडलेले असते म्हणून या रेषांना समताप रेषा असे म्हटलेल जाते या समताप रेषेवरुन कमी आणि जास्त तापमानाचे प्रदेश ओळखले जातात. तसेच समान तापमान असणारी सर्व स्थळांचा अभ्यास करणे सोपे जाते.

          हवामान दर्शक नकाशा ढगांची असणारी स्थिती एक छोटया वर्तूळाच्या सहाय्याने दर्शविली जाते या वर्तूळात पूर्ण, अर्ध, अशा प्रकारच्या विविध छटा असतात. या वरुन कोणत्या प्रदेशात परीस्थती ढगाळ आहे किंवा पाऊस पडण्याची शक्यता आहे हे ओळखले जाते. ज्या ठिकाणी आकाश कोरडे असते अशा ठिकाणी पावसाची शक्यता नसते. सदर नकाशात जून महिन्यात येणा-या पावसाच्या आगमानाची परीस्थती पण दर्शविली जाते जीला  NLM (North Limit of Manson ) असे म्हणतात  जी पर्जन्याची परीस्थती विविध महिन्यात विविध प्रकारची असते

          हवामान दर्शक नकाशात वा-याचा वेग व त्याची  वाहण्याची दिशा दर्शविली असते तसेच वा-याचा वेग किंती आहे हे वा-याच्या सांकेतीक खूणेवरुन लक्षात येते. या वा-याच्या सांकेतीक खूणेवरुन वारा कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे जात आहे हे पण सांगता येते.

          हवामान दर्शक नकाशात हवामानाच्या परीस्थीती बरोबर समुद्राच्या स्थ्‍िातीचे वर्णन नकाशात करण्यात येते या साठी समुद्राच्या परीस्थती दर्शविणारी काही सांकेतीक खूणा असतात त्या खूणांवरुन समुद्र शांत आहे किंवा खवळलेला आहे किंवा अति खवळलेला आहे हे ओळखता येते याच बरोबर समुद्राच्या लाटांच्या दिशा ओळखतात येतात.

bottom of page