महाराष्ट्रातील नैसर्गीक क्षेत्र हे एकूण तीन नैसर्गीक विभागत विभागलेले आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे पठार दुसरे म्हणजे सहयाद्री रांगा आणि कोकण किनारपट्टी.
महाराष्ट्रातील माती आणि वनस्पती तसेच हवामान यांचा प्रत्यक्ष संबंध हा भूगर्भशास्त्राशी आहे.
कृष्णा, गोदावरी, वर्धा, नदयाचे प्रमुख झीज कार्य हे दख्खनच्या पठारावर पहावयास मिळते.
तसेच तापी या नदीने झीज कार्यमुळे जे नक्षी काम तयार झाले आहे त्यामुळे या खो-यात अनेक छोटी पठारे तयार झाली आहे.
दख्खनच्या पठावरील अर्ध्या भागातील माती कोरडी आहे तर बहुतेक माती ही ब्लॅक बेसाल्ट या मातीची आहे हा मातीचा प्रकार म्हणजे चिकणमाती होय हि चिकण माती पाण्याचा ओलावा घरुन ठेवते हि माती काळया कापसाची माती म्हणून ओळखली जाते तसचे या मातीला रेगूर माती असे म्हटले जाते. अशा प्रकारे महाराष्ट्रात नैसर्गीक क्षेत्रे र्निमाण झाली आहेत.
महाराष्ट्रात झालेली ज्वालामुखीचा क्रिया जवळजवळ 60 ते 90 दशलक्ष वर्षांपूर्वीची आहे.
आज या दख्खन क्षेत्रात वेगवेगळी मातीची रचना घडलेली पहावायस मिळते हि तयार होणारी माती ही अग्नीजन्य खडकापासून बनलेली आहे जी काळी माती म्हणून ओळखली जाते जी खूप सूपीक असून ती काळी माती रब्बी पिकांसाठी उपयुक्त आहे. मातीचा हा प्रकार झीज कार्य करण्यास प्रतिकारक असतो जो पाणी आणी वा-याला प्रतिबंध करतो आणि या मातीच्या प्रकारात ब-याच अंशी पाण्याचा अंश असतो त्यामुळे माती ओलावा असणारी असते जी पिकांस पोषक आहे.
महाराष्ट्रातील काही डोंगराळ उंच टेकड्यावर तसेच काही उतरावर आणि मौदानी प्रदेशात लॅटराईट स्वरुपाची माती आढळते तीचा रंग लालसर किंवा तपकिरी असा असतो अशा मातीत तांदूळ, , ज्वारी, ग्राम, शेंगदाणे, ऊस इत्यादी पीकाची येथे लागवड करण्यात येते. तसेच, अंबा काजू, फणस, इत्यादी फळांची देखील लागवड करण्यात येते.या मातीचे वनक्षेत्र आपल्या महाराष्ट्रात जास्त आहे.
सह्याद्री पर्वतरांगांना पश्चिम घाट म्हणतात आणी या सहयाद्री पर्वतरांगां अरबी समुद्र किनाऱ्याला समांतरअशा पसरलेल्या आहेत या पर्वतरांगांच्या काही अनेक शाखा पूर्वेकडे आहेत.
महाराष्ट्रातील बहुतेक नद्या सह्याद्रीच्या पर्वतरांगात उगम पावतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगातील असणारी माती ही लालसर किंवा तपकिरीरंगाची पहावयास मिळते तर काही ठिकाणी वेगळया रंगाची पहावयास मिळते तीचे वेगळे पण त्या मातीतील नायट्रोजनमुळे आहे. या जमीनी पठराच्या सपाटी पासून त्याच्या पार-या पाय-याच्या उतारापर्यत आहेत या संक्रमणकालीन क्षेत्राला 'मावळ' म्हणतात. या भागामध्ये भाजीपाला, बटाटे, कांदा, मिरची, वांगं आणि टोमॅटो याप्रमाणेच खरीप अन्नधान्या, ऊस आणि भुईमूग हि पिके घेतली जातात तसेच आंबा, केळी, द्राक्षे आणि काजूही अशी फळे देखील घेतली जातात.
विदरीत मातीचा परीणाम म्हणून महाराष्ट्रातील काही ठिकाणची माती ही थोडयाफार प्रमाणात अल्कधर्मी झाली आहे. जीच्यातील पाण्याचा निचरा लवकर होते अशी माती सिंचनासाठी चांगली असते. या ठिकाणी खरीप आणि रब्बी पीक घेतली जातात जसे ज्वारी, गहू, बाजरी शेंगदाणे, उडीद .
तटीय कोकण म्हणजेच अरबी समुद्रा पासून ते सह्याद्रीच्या रांगेपर्यतचे अंतर साधारणता दरम्यान 50 किलो मिटर इतके आहे हा प्रदेश सर्वसाधरण प्रदेश नाही तर तो एखादया सडपातळ दरी सारखा पहावयास मिळतो या प्रदेशानंतर पठारी प्रदेशास सुरुवात होते.
वनस्पतींमध्ये प्रामुख्याने पूर्वेकडील जंगलात आणि सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत आणि चंद्रपूर क्षेत्र यांचा समावेश होतो. महाराष्ट्र प्रदेशाची सर्वसाधारण झीज या प्रदेशातील आहे वनस्पती तोडल्याने पूर्वेकडील जंगले तसेच सातपुडा पर्वत रांगा आणि चंद्रपूर वनक्षेत्र याचा यात समावेश आहे. कोकण किनारपट्रटी प्रदेशातील होणारे झीजकार्य खारफूटी, अंबा नारळ तसेच इतर झाडेझुडपे यांच्या व्दारे थांबबीले जाते
आपल्याकडील साग बांबू सारख्या झाडांना चांगले मुल्य किंवा उच्च स्वरुपाचे मुल्य आहे. या झाडांचे अस्तीस्व असणारे प्रदेश समुध्द असलेला पहावयास मिळतो. जादा सदाहरित वनस्पतीविरहित जंगलांनी महाराष्टत १७ टक्के जमीन व्यापली आहे