महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या
. महाराष्ट्रातील जलप्रणाली विविध प्रकारची सहयाद्री पर्वत रांगेत उगम पावलेल्या नदया बंगालच्या उपसागराला आणि अरबी समुद्राला मिळतात.
. भूरचना आणि जलप्रणाली यांच्या दरम्याण साम्यता आढळते. दक्षिण दख्खन पठारावरुन पाण्याचे प्रवाह जलद गतीने वाहतात.
. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त नदीच्या वाहणाच्या दिशा पूर्व आणि आग्नेयकडे दिसून येतात. मात्र तापी आणि तिची पुर्णा उपनदी अपवाद ठरली असून ती खचदरीतून पश्चिमेकडे वाहते.
. महाराष्ट्रातील नद्यांमुळे संपूर्ण प्रदेशाची विविध भागात विभागणी झालेली आढळते. गोदावरी, कृष्णा, ताप्ती (तापी) ह्या प्रमुख नद्या होय. या सर्व नद्या म्हणजेच महाराष्ट्रातील मुख्य भाग आहेत.
. या सर्व नद्यांना महाराष्ट्राची जीवन रेखा म्हटले जाते. या महाराष्ट्रातील मुख्य नद्या आणि त्यांच्या उपनद्यांची चर्चा आपण करणार आहोत.
महाराष्ट्रातील नदी प्रणालीची विभागणी प्रमुख पाच जलप्रणालीत होऊ शकते. ती पुढील प्रणाणे :
(१) कोकणातील नदी प्रणाली
(२) कृष्णा-भीमा नदी प्रणाली
(३) गोदावरी नदी प्रणाली
(४) तापी-पूर्णा नदी प्रणाली
(५) वर्धा नदी प्रणाली
(१) कोकणातील नदी प्रणाली/पश्चिम घाटातील पश्चिम वाहिन्या नदी प्रणाली.
. कोकण किनारपट्टीचा प्रदेश हा तापी नदीच्या खो ताप्ती नदीच्या दक्षिणेस व अरबी समुद्राला लागून असलेला कोकण किनारपट्टीचा प्रदेश आहे.
. हा प्रदेश पूर्वेकडे सह्याद्री पर्वत किंवा पश्चिमेकडील घाट यांनी जुळलेला आहे.
. सह्याद्रीचा पश्चिमेकडील टेकड्या ६४ किमी च्या अंतरावर अरबी समुद्रात मिळतात.
. कोकण किनारपट्टीचे चिंचोळे स्वरुप, सह्याद्री पर्वतापासून अंतर्गत भागात विखुरलेल्या टेकड्याचे सुळके आणि असंख्य लहान/आखूड व वेगवान नद्या असून त्या पश्चिमेकडे वाहतात त्यापैकी उल्हास ही उत्तरेस असणारी सर्वात मोठी नदी आहे.
. कोकणातील नद्याची वैशिष्ट्ये
. कोकणातील नद्यांची लांबी आणि नदीचे पाणी साठवण्याचे क्षेत्र यांचा विचार करतातना महाराष्ट्र पठारावरील नद्यांच्या तुलनेने कोकणातील नद्यांना फारसे महत्व नाही.
. कोकणातील सर्व नद्या शीघ्र प्रवाही आणि कमी लांबीच्या/आखूड आहेत.
. पश्चिम घाट हा कोकणातील नद्यांचे मुख्य स्त्रोत आहे त्याच बरोबर नद्यांची लांबी हा ५० कि.मी ते १५५ किमी एवढी आढळते.
. कोकणातील नद्या ह्या सर्वसाधारणपणे एकमेकास समांतर वाहतात.
. महाराष्ट्रात ११ पेक्षा जास्त पश्चिम वाहिन्या नद्या असून दमणगंगा, सुर्या, वैतरणा उल्हास सावित्री कुंडलिका, पाताळगंगा, वशीष्ठी, शाली, कर्ली, तेरेखोल यांचा समावेश कोकणांतील नद्यांत होतो.
. त्यातील काही नद्या ह्या आखूड असून त्या खाड्यांना मिळतात.
. या नद्यावरील त्यांच्या भौगोलिक रचनेमुळे त्यावर मोठी धरणे बांधली गेली नाहीत. कोकणातील विभागवार नदीप्रणाली.
(अ) उत्तर कोकणातील नदीप्रणाली.
(ब) मध्य कोकणातील नदीप्रणाली
(क) दक्षिण कोकणातील नदीप्रणाली
(अ) उत्तर कोकणातील मुख्य नदी प्रणाली खालील प्रमाणे.
(१) दमणगंगा नदी
महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्या मधील दिंडोरी तालुक्यामधील आंबगांळ गावाजवळ असणार्या सह्याद्री पर्वत रांगेत या नदीचा उगम होतो. नदीची समुद्रसपाटीपासूनची उंची ९५० मी असून अरबी समुद्राला मिळण्यापूर्वी एकूण अंतर १३१ किमी प्रवास करते.
. दावण, श्रीमंत, वाल, रायती, लेंडी, वाघ, सकरतोंड, डोंगरखाडी, रोशनी आणि दुधणी ह्या महत्वाच्या दमणगंगेच्या उपनद्या आहेत.
. अरबी समुद्राला मिळण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य, गुजराथ राज्य आणि दादरा नगर हवेली आणि दमण व दिव या kोंÀद्रशासित प्रदेशातील दमणगंगा नदीचे खोर्याने एकूण २३३१ ची किमी व्यापले आहे.
(२) वैतरणा नदीचे खोरे
. पालघर जिल्हयातील वैतरणा ही मुख्य नदी आहे.
. उत्तर मुंबई आणि तापी नदीच्या दक्षिणेस असलेली वैतरणा नदी ही एक या प्रदेशातील पश्चिम वहिनी नदी आहे.
. गोदावरी नदीच्या उगमाच्या अगदी विरुध्द बाजूस असणार्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक टेकड्यामध्ये उगम पाऊन पुढे पालघर जिल्ह्यातील कसारा जवळील विहेगाव मधून वाहत जाते.
. वैतरणा नदीची एकूण लांबी १५४ किमी ऐवढी आहे.
. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील असणार्या सह्याद्री पर्वत रांगेत वैतरणा नदीचा उगम पावते आणि नंतर महाराष्ट्रातून सुमारे १७१ किमीचा प्रवास करुन अरबी समुद्राला मिळते.
. पिंजाल, सूर्या आणि तानसा ह्या वैतरणा नदीच्या मुख्य उपनद्या आहोत.
(३) उल्हास नदी
. महाराष्ट्रातील उल्हास नदी ही एक पश्चिमवाहिनी नदी असून ती अरबी समुद्राला मिळते.
. १८०४४' ते १९०४२० उत्तर अक्षवृत्त आणि ७२०४५' ते ७३०४८' पूर्व रेखावृत्ता दरम्यान उल्हास नदीचे खोरे आढळून येते.
. उल्हास नदीची एकूण लांबी १३० किमी असून कोकणातील सर्वात लांब नदी आहे.
. उल्हास नदी बोर घाटाच्या दर्यामध्ये उगम पावते. व मुंबईच्या परिसरात नदीने एक मोठे खोरे बनलेले आहे.
. या खोर्याची सीमा पूर्वेकडे सह्याद्री टेकड्या उत्तरेकडील टेकड्या व दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील मिळणारा भाग या उल्हास नदीच्या खोर्याच्या सीमा आहेत.
. उल्हास नदी पश्चिम दिशेला वाहत जाते आणि ठाणे तसेच रायगड जिल्ह्यात प्रवेश करते/जिल्हयातून वाहते.
. उल्हास नदीचा मार्ग भारवी नदीच्या मार्गाला मिळतो.
. मुंबई बंदरात जेथे मिळते तेथे नदीचा मार्ग रिकामा झालेला आढळतो.
. भातसा, कालू, आणि भारवी या उल्हास नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत.
. महाराष्ट्रात उल्हास नदीने ४६३७ ची किमी क्षेत्र व्यापले आहे.
. ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यांचा क्षेत्र या खोर्यामध्ये समाविष्ट होतो. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उल्हास नदीचा उगम झाला असून समुद्रसपाटीपासून उंची ६०० मी आहे.
. पेज, बारवी, भिवपुरी, मुरबारी, कालू, शारी, भातसा, सालपे, पोशीर आणि शिलार या उल्हास नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत. कालू आणि भातसा नदी उल्हास नदीच्या उजव्या किनार्यावर येऊन मिळणार्या उपनद्या असून उल्हास नदीच्या एकूण पाणलोट क्षेत्रापैकी ५५.७टक्के क्षेत्र या दोन्ही नंद्यानी एकत्रितपणे तयार केले आहे.
(ब) मध्य कोकणातील प्रमुख जलप्रणाली खालील प्रमाणे -
(१) पाताळगंगा नदी
ही नदी पश्चिमेकडील टेकड्यामधून उगम पावते माथेरानच्या पठारावरुन विविध शाखातून वाहते आणि पुढे या शाखा खोपोली जवळ मिळतात आणि पश्चिमेकडे वाहत जावून धरमतर खाडीला जाऊन मिळतात.
(२) अंबा नदी -
. अंबानदीचा उगम ५५४ मी उंचीवर खोपाली - खंडाळा रस्त्याच्या जवळ असलेल्या सह्याद्री रांगेतील बोरघाट टेकड्यामध्ये झाला आहे.
. सुरुवातीस अंबा नदी दक्षिण दिशेकडे वाहत जाते आणि नंतर वळसा घेऊन वायव्येकडे वाहत जावून अरबी समुद्राला मिळण्यापूर्वी ती रेवस गावाजवळील धरमतर खाडीला येऊन मिळते.
. अंबा नदी समुद्राला मिळण्यापूर्वी नदीचा एकूण ७६ किमी लांबी आहे.
(३) कुंडलिका नदी
. महाराष्ट्रातील भाबुर्डा गावाजळील पश्चिम घाटाच्या सह्याद्री टेकड्यावर या नदीचा उगम पावतो. कुंडलिका नदी ही एक पश्चिम वाहिनी नदी आहे.
. सुरुवातीस ही नदी पासुन गावापर्यंत नैऋयकडे वाहत जाते नंतर वायव्यकडे वळसा घेऊन अरबी समुद्रास मिळते.
(४) काळ नदी -
. काळ नदी ही एक महाराष्ट्रातील/कोकणातील पश्चिम वाहिनी नदी आहे.
. सावित्री नदीची ही प्रमुख उपनदी आहे.
. काळ नदीचे खोरे अंदाजे १८००५' ते १८०२५' उत्तर अक्षांवर आणि ७३०१०' ते ७३०१३' पूर्व रेखांश दरम्यान आहे.
. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामधील सह्याद्री पर्वत रांगेत काल नदी उगम पावते. या नदीच्या उगमाच्या समुद्रसपाटीपासूनची उंची ६२५ मी आहे.
. या पश्चिम वाहिनी नदीच्या उगमापासून ते सावित्री नदीच्या संगमापर्यत या नदीची एकूण ४० किमी लांबी आहे.
. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात या नदीचे ६७०चौ किमी क्षेत्र व्यापले आहे. काल ही सावित्री नदीचा महत्वाची उपनदी असून ती उजव्या किनार्यावर येऊन मिळते आणि सावित्री नदीच्या खोर्यात एकूण २३ टक्के क्षेत्र पाण्याचा साठा आढळतो.
(५) शास्त्री नदी -
. समुद्रसपाटीपासून ८३९ मी उंचीवर असलेल्या आणि महाराष्ट्रामधील कोकण प्रदेशातल्या अनेक भागात पसरलेल्या पश्चिम घाटामधील पश्चिम उतारावर असलेल्या,१७०२७० परिघम आणि ७३०४८' पूर्व अनुक्रमे अक्षाश व रेखांश या दरम्यान परिघर घाटातील उंचीवर आणि प्रचितीगडची शेजारी शास्त्री नदीचा उगम पावते.
. संपूर्ण रत्नगिरा जिल्ह्या या नदीने व्यापला असून संगमेश्वर रत्नागिरी आणि गुहाग हे तीन तालुके या नदीचे व्यापले आहेत.
. अंदाजे नदीची एकूण लांबी ८० किमी असून पहिले २० किमी चा प्रवास अति तीव्र अशा टेकड्याच्या प्रदेशातून वाहते.
. या खोर्याने २१७३.५५ चौ किमी व्यापले आहे.
. शास्त्री नदीच्या उपनद्यामध्ये नद्या आणि ओढा अथवा नात्यांचा समावेश आहे.
(६) वशिष्ठी नदी -
. वशिष्ठी नदी ही रत्नागिरी जिल्यातून वाहते आणि या नदीने गुहागर, दापोली, खेड आणि चिपळूण तालुक्यातील २२३३ चौ किमी क्षेत्र लावले आहे.
(७) सावित्री नदी -
. भारतातील महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वरच्या पठारावर एकूण ५ नद्यांचा उगम झाला त्यापैकी सावित्री नदी ही एक आहे.
. सावित्री नदीचा उगम महाबळेश्वरमधून होऊन रायगड जिल्ह्यातून नदीचा प्रवाह जातो आणि शेवटी हरीहरेश्वर जवळ ती अरबी समुद्रास मिळते.
. पोलादपूर, महाड, माणगांव, श्रीवर्धन तालुक्यातून नदी वाहते.
. नदीच्या शेवटच्या टप्प्यातील १०० कि.मी अंतरावर रायगड आणि रत्नागिरी जिल्हा दरम्यान नदीने दोन जिल्यांच्या सीमा तयार केल्या आहेत.
. सावित्री नदीची काल ही प्रमुख उपनदी असुन ती दासगाव जवळ उत्तरे दिशेने नदी घुसते.
(क) दक्षिण कोकणातील महत्वाच्या नद्या खालीलप्रमाणे
(१) काजवी नदी
. सह्याद्री टेकड्यातील विशाल घाट प्रदेशात काजवी नदीचा उगम असून पुढे ती नदी पश्चिमेकडे वाहत जाते जिथे १० कि.मीचा लांबीची भाट्याची खाडी निर्माण झाली आहे तेथे म्हणजेच रत्नागिरी बंदराजवळ काजवी नदी अरबी समुद्रास मिळते.
. मान्सूनच्या काळात काजवी नदीच्या मुख्यापासून सुमारे २५ की. मी अंतरावर हेरचेटी गांवापर्यत समुद्रातील भारतीचा / लांटाचा परिणाम जाणवतो.
. नदीच्या तळाची रचना ही दगड, गोटे सहीत रेती, यांचे मिश्रण असलेले आढळते.
(२) गड नदी -
. अंदाजे १६००' ते ७३०३०' ते ७४००' पूर्व रेखांशांच्या दरम्यान गड नदीच्या खोर्याचे भौगोलिक स्थान आहे.
. महाराष्ट्रातील ही नदी पश्चिम वाहिनी असून अरबी समुद्राला मिळते.
. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णपणे गड नदीने ८९० चौ कि मी क्षेत्र व्यापले आहे.
. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समुद्रसपाटीपासून ६०० मी अंतरावर असलेल्या सह्याद्री टेकड्यांच्या रांगेत गड नदीच्या उगम होतो.
. गड नदीच्या उगमापासून ते अरबी समुद्राला जिथे मिळले तिथंपर्यंतचे एकूण ६६ किमी नदीची लांबी आहे.
. उसाल ही गड नदीची प्रमुख महत्वाची उपनदी आहे.
. चुनावरा गावाजवळ कसाल नदी गडला येऊन मिळते.
. मान्सूनच्या काळात चुनावरा गावापर्यंत लाटांचा समुद्राच्या भरतीचा परिणाम जाणवतो.
. गड नदीच्या एकूण पाणलोट क्षेत्रापैकी २०.८ टक्के क्षेत्र कसाल नदीने व्यापले आहे. कोकणातील इतर नद्या
(अ) भोगश्वरी
. महाराष्ट्रातील रायगड जिल्यातील भोगेश्वरी गावाजवळ असलेल्या पश्चिम घाटात भोगेश्वरी नदी उगम पावते. या नदीचा उगम समुद्र सपाटीपासून २२८.६ मी उंचीवरआढळतो.
. पेण तालुक्यातून ही नदी पश्चिम दिशेने वाहते आणि पुढे अंतोरा गावाजवळील धरमतर खाडीत ती विलीन होते.
. ही नदी समुद्राला मिळण्यापूर्वी नदीची एकून लांबी ४० कि मी आहे.
(ब) मिठी नदी
. मिठी नदीलाच माहिमची नदी या नावाने ओळखले जाते.
. विहार व पवई तलावातील पाण्याचे विसर्ग या नदीला मिळताता
. ही हंगामी नदी आहे.
. उत्तर मुंबईतील संजयगांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या टेकड्यामधून ही नदी उगम पावते. व माहिमच्या खाडीला मिळते.
(क) ओशिवरा नदी
. ओशिवरा नदी आरे इथे वसाहतीमध्ये उगम पावून गोरेगाव टेकड्यांना वळसे घालून
मालाडच्या खाडीत विलीन होते.
(२) कृष्णा-भीमा जलप्रणाली
. कृष्णा नदी
. सातारा जिल्ह्यातील जोर गावाजवळ, १३३७ मी उंच असलेल्या पश्चिम घाटातील उत्तर महाबळेश्वर मध्ये कृष्णा नदीचा उगम पावते. हे उगमस्थान अरबी समुद्रापासून सुमारे ६४ कि.मी अंतरावर आहे. कृष्णानदीचा सुमारे १४०० कि मी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते.
. घटप्रभा, मलप्रभा, भीमा, आणि तुंगभद्रा या कृष्णेला मिळणार्या प्रमुख उपनद्या आहेत. तीन राज्यासह एकूण २५८९४८ चौ किमी कृष्णा नदीचे खोर्याने व्यापले आहे. त्यापैकी देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळजवळ ८टक्के क्षेत्र कृष्णा नदीने व्यापले आहे.
. कृष्णा नदीचे खोर्याचे क्षेत्र कर्नाटक राज्यात (११३२७१ चौ किमी) आंध्रप्रदेश (७६२५२ चौ किमी) आणि महाराष्ट्रात (६९४५५ चौ किमी) या तीन राज्यात आढळते. कृष्णा नदी २५.९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र ओलीताखाली व्यापले आहे.
. देशाची इतर सीमा वगळला या नदीच्या खोर्याचा बराचसा प्रदेश सौम्य चढ उताराचा आढळतो. त्यामुळे पश्चिम घाटाचा अखंड रांगा तयार झालेली आहे.
. कृष्णा नदीच्या खोर्यात काळी, लाल, जांभी, गाळाची, संमिश्र, काळी, क्षारमुक्त आणि अल्कधर्मी या महत्वाच्या मृदा आढळतात.
. या खोर्यामध्ये वार्षिक सरासरी भूपृष्ठावरील पाणी ७८.९ घन कि.मी चे मूल्यांकन केले गेले आहे.
(३) गोदावरी जलप्रणाली
. महाराष्ट्रातील तसेच मध्य भारतातील ही एक महत्वाची प्रमुख नदी आहे.
. नाशिक जिल्ह्यातील १०६७ मी उंचीवर असलेल्या पश्चिम घाटातील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचा उगम होतो.
. बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी महाराष्ट्रातील संपूर्ण दख्खनच्या पठरामधून सुमारे पूर्वेकडे सुमारे १४६५ कि.मी लांबीचा प्रवाह वाहत जातो.
. पश्चिमेपासून दक्षिण भारतापर्यंत ही नदी वाहत जाते.
. गंगा नदीनंतर गोदावरी नदी ही भारतातील दुसरी क्रंमाकाची मोठी नदी आहे.
. असे मानले जाते की भारतातील मोठ्या नदीच्या खोर्यां पैंकी हे एक खोरे आहे.
. या नदीच्या र्याने महाराष्ट्र राज्यात (१५२१९९ चौ कि.मी) ओरिसा (१७७५२ चौ कि.मी) आणि कर्नाटकात (४४०५ चौ कि.मी) क्षेत्र व्यापले आहे.
. प्रवरा, पुर्णा, मांजरा, इंद्रावती, वैनंगंगा, वर्धा, पेंच, कन्हान, कोलाब आणि पैनंगंगा ह्या गोदावरीच्या प्रमुख उपनद्या आहेत.
. गोदावरी खोर्याचे एक खास वैशिष्ट्ये असे की पश्चिम घाटाच्या खालील उतारावरुन या खोर्यात पाणी वाहते. मांजरा, प्राणाहिता, इंद्रानती, या नद्यांचे पाणी या नदीत सोडतात.
. गोदावरीचे नदीचे खोरे वाढीव क्षेत्र ३१२ ८१२ कि.मी हे पांच राज्यात असून त्यापैकी देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ९.५टक्के क्षेत्र या खोर्याने व्यापले आहे.
. गोदावरी नदीचे ३१.३ दशलक्ष हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आहे.
. गोदावरीच्या प्रमुख उपनद्यांचा तपशील खालील तक्यात दर्शवितो. गोदावरी नदीच्या खोर्यामध्ये मोठे चठउतार असलेले मैदान हे खाली असलेल्या सपाट माभ्याचे टेकड्यांच्या रांगा यांचा समावेश होऊन बनलेले आहे.
. काळी मृदा, निळ मृदा, जांभी मृदा, गाळाची मृदा, संमिश्र मृदा, क्षारयुक्त आणि अल्कधर्मी मृदा अशा महत्वाच्या मृदांचे प्रकार या खोर्यात आढळतात.
. नांदेड शहरापासून ५ कि.मी अंतरावर, आशिया खंडातील सर्वांत मोठा 'विष्णूपुरी प्रकल्प' हा जलसिचन प्रकल्प या नदीवर आहे.
(४) तापी-पूर्णा जलप्रणाली
. मध्य भारतातील तापी जलप्रणाली आहे.
. मध्य प्रदेशातील तैल जिल्ह्यातील ७५२ मी उंचीवर असलेल्या मुल्ताई जवळच्या प्रदेशात तापी नदीचा उगम पावतो.
. भारतीय -द्विर्घकल्पावरील अनेक नद्यापैकी ही एक प्रमुख जलप्रणाली असून ७२४ कि.मी लांबी जलप्रणाली आहे. अरबी समुद्राला मिळण्यापूर्वी ती खंबातच्या आखातातून वाहत जाते.
. तापी नदी भारतातील एकमेव तिसर्या क्रंमाकांची नदी आहे की जी नर्मदा आणि महीमदी नदी नंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते.
. दक्षिण मध्य प्रदेशातील पूर्वेकडे असणार्या सातपुडा पर्वत रांगेला या नदीचा उगम पावून ती पश्चिमेकडे आणि दक्षिण गुजरात मधून खांबायतच्या आखातातून अरबी समुद्राला मिळते.
. पूर्णा, गिरणा, पांझरा, वाघूर, बोरी आणि अनेर ह्या प्रमुख तापीच्या उपनद्या आहेत.
. तापी नदीचे खोर्याचा विस्तार हा तीन राज्यात झालेला दिसून येतो ६.६५१५५ चौ. कि.मी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र व्यापलेले आहे. देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे २ टक्के क्षेत्र या नदीने व्यापलेले आहे.
. जरी असे असले तरी नर्मदा नदी पेक्षा तापी नदीचे क्षेत्र कमीच आहे. तापी नदी मात्र गाळाच्या मृदेने समृध्द असून शेतीसाठी लागणारी चांगली मृदा तयार होते.
. या खोर्याची वार्षिक भूपृष्ठ जल क्षमता १८ घन कि.मी इतकी मूल्याकिंत केली आहे.
(५) वर्धा नदी प्रणाली
. गोदावरीची नदीची वर्धा ही उपनदी आहे.
. सातपुडा पर्वत रांगेतील मुल्ताई पठारावर या नदीसी उगम पावतो. आणि संपूर्ण वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील सिमेवरुन ही नदी वाहत जाते.
. बोर, धाम, पोथरा, असोडा आणि उन्हा हा वर्धाच्या उपनद्या आहेत.
. अमरावतीपासून ५६ कि.मी अंतरावर, आणि मोर्शीच्या ८ कि.मी पूर्वेकडे, सिमभोरा जवळ अप्पर वर्धा धरण वसलेले आहे.
. वर्धा नदीच्या वर हे धरण बांधलेले आहे.
. हे एक मातीचे धरण असून ३६ मी उंच आणि ७ कि.मी लांबीचे धरण अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सिमेवर आहे.
. या दोन जिल्ह्यातील या धरणाची धारणा क्षमता ७५०० हेक्टर क्षेत्र ऐवढीआहे.
. तेथे एक पर्यटन केद्रं म्हणून विकसित होत आहे. साध्य याला नल-दमयंती सांगर या नावाने ओळखले जाते.
५.५.२ इतर महत्वाच्या उपनद्या
मांजरा -
. मांजरा नदी ही गोदावरी नदीचा प्रमुख उपनदी असून बालाघाटच्या टेकड्यावर तीचा उगम झालेला आहे
. गोदावरी नदीच्या एकूण पाण्यापैकी जवळजवळ ६ टक्के पाण्याचा सहभाग या नदीचा आहे.
. नांदेड जिल्ह्याचा उत्तरेकडील उत्तर बाजूकडे असणार्या पूर्व सिमेला लागून ही नदी वाहते. नंतर ती गोदावरीला मिळते.
. मन्याड आणि लेंडी ह्या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत.
मुळा आणि मुठा -
. मुळा नदीच्या उत्तरेला लागून आणि मुठा नदीच्या पश्चिमेस पुणे शहर वसलेले आहे. या दोन नद्या संगम पुलानजीक (पूर्वी त्याला वॅल्स्की पूल म्हणत) वायव्येस येऊन मिळतात तेथे मुळा-मुठा संगमाचा आकार प्राप्त झालेला दिसून येतो.
पैनगंगा -
. पैनगंगा ही गोदावरीची नदीची एक उपनदी आहे.
. गोदावरी नदीची पैनगंगा ही एक उपनदी आहे.
. कयाधू नदी ही पैनगंगेचा उपनदी आहे.
. नांदेड जिल्ह्याच्या उत्तर सीमेलगत ही नदी वाहत जाते आणि या नदी 'उप्पर पैनगंगा प्रकल्प बांधल्यामुळे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र जलसिंचित झाले.
. या नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा प्रसिध्द आहे.
पुर्णा नदी-
. पुर्णा ही एक गोदावरीची उपनदी असून मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात नदीचा उगम पावतो अकोला जिल्ह्याचा संपूर्ण पश्चिम भागातून वाहत जावून बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करते.
. परभणी जिल्ह्यातील उत्तरीय भागात पूर्वेकडून पश्चिमकडे वाहत जाते आणि पुर्णा तालुक्यातील कंठेश्वर नजीक ही नदी गोदावरीला येऊन मिळते.
. पेंढी, उमा, काटेपुर्णा, निर्गुणा आणि मीठा ह्या नद्या पुर्णा नद्याच्या दक्षिण किनार्यावर येऊन मिळण्यार्या प्रमुख उपनद्या आहेत.
. सर्व उपनद्यापैकी काठेपुर्णा ही सर्वात मोठी नदी उपनदी असून वाशिम पासून काही
किलोमीटर अंतरवर या नदीचा उगम होतो. मूर्तीझापूरचा वायव्य कोपरा आणि अकोला तालुक्याचा पूर्वेकडील संपूर्ण बाजू या नदीने सामावलेली आहे.
. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात येलदरी धरण (जलवियुत शकती द्रा हे प्रमुख धरण पूर्णा नदीवर आहे. पेंच आणि कानन . पेंच आणि कानन नद्या पूर्वेकडील पठारावरील प्रमुख नद्या आहेत. सातपुडा रांगावरुन चिंचवर्ड जिल्ह्यातून वाहत जावून कामरी नदीस मिळतात व पुढे दोन्ही नद्या कोलारला जाऊन मिळतात.
. कानन नदी बारगांव जवळ जालवा जिल्ह्यात प्रवेश करते. व पूर्वेकडे खापला ते कामरी अशी वाहत जाते आणि पुढे पेयं आणि कोलार नदीला मिळते.
. तीच्या पुढील प्रवासात ती रामटेक तालूक्याची सीमा बनते. भिवकुंड टेकड्या जवळ नाग नदी मिळते व शेवटी भंडारा जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथे वैनगंगेत विलीन होते.
मिरा
. मिरा नदी ही भीमेचा महत्वाची उपनदी आहे.
. सातारा जिल्ह्यातील उत्तरेकडील सीमेला लागून वाहत जावून पुढे आग्नेयकडे वाहत जाते.
सिना
. सिना नदी ही भीमेची उपनदी असून उत्तरेपासून ते आग्नेयपर्यन भीमा नदीला समांतर वाहते. करमाळा, मध्य माठा, बार्शी, पूर्व मोहो आणि उत्तर व दक्षिण सोलापूर या भागातून पुढे वाहत जाते.
वैनगंगा
. वैनगंगा ही गोतावरी नदीची उपनदी आहे.
. वैनगंगेच्या अनेक उपनद्या दोन्ही किनार्यावर मिळाल्या आहेत. चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम, मध्य आणि पूर्वे प्रदेशातून पुढे ही नदी वाहत जाते.
. गाढवी, खोब्रगडी, काथणी, आणि पोटफोंडी या प्रमुख वैनगंगेच्या उपनद्या डाव्या तीरावरा आणि अंधारी उपनदी ही उजव्या तीरावर येऊन मिळते.
नीरा
. नीरा नदी ही भीमेघा नदीची उपनदी असून पुणे जिल्ह्याच्या आग्नेय सीमेवरुन काही अंतरावरुन पुढे वाहत जाते.