स्थान,विस्तार आणि सीमा
महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ ३.०७,१३ चौ.मी असून क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येचा विचार करता भारतात महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र राज्याचे स्थान किनारवर्ती असून भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून आहे.
देशाच्या पश्चिम व मध्यवर्ती विभाग या राज्यात समविष्ट असून राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राला लागून ७२० कि.मी.ची कोकण किनारपट्टी लागलेली आहे.
. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार १५अंश ४०मिनीटे उ. अक्षवृत्त ते २२अंश ०० मिनीटे उत्तर अक्षवृत्त असून रेखांश विस्तार ७२मिनीटे ३६अंश पूर्व रेखावृत्ते ८०अंश ५४मिनीटे पूर्व रेखावृत्त या दरम्यान आहे.
. महाराष्ट्र राज्याचा पश्चिमेस असणारा सह्याद्री पर्वत हा राज्याचा प्राकृतिक दृष्ट्या महत्वाचा कणा मानला जातो. तसेच उत्तरेस सातपुडा पर्वत रांगा पूर्वेस भामरागड-चिरोली-गायखुरी पर्वत रांगा या नैसर्गिक सीमांनी समाविष्ट झाल्या आहेत.
. महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक राज्ये, अग्नियेस आंध्रप्रदेश, उत्तरेस गुजरात, दादरा नगर हवेली आणि मध्यप्रदेश राज्ये, पूर्वेस छतीसगड राज्यांची सीमा भिडलेली असून महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्राने वेढलेले आहे. महाराष्ट्राचा प्राकृतिक रचनेची सर्वात महत्वाची चित्रवेधक बाब म्हणजे पश्चिम घाट आणि दख्खनचे पठार
. भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या राज्याच्या संपूर्ण प्रदेशामध्ये दख्खनच्या पठाराच्या जडणघडणीत एकरुप होण्यासाठी काही मर्यादा पडतात भूगार्भाच्या खाली असणार्या वैंनगंगा खोर्यांचा प्रदेश आणि आकाराने लहान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचा समुद्रकिनारा हे दोन प्रदेश सोडले तर महाराष्ट्र राज्यांची भूमी खाली असलेल्या बेसॉल्ट खडकालाच दख्खनचे पठार असे म्हटले जाते.