top of page

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. स्थापनेचा वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभाग होते.

 

सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत.

महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:

  1. कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.

  2. पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

  3. नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.

  4. औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

  5. अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.

  6. नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

नैसर्गिक सीमा :

  1. वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.

  2. उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.

  3. ईशान्येस : दरेकासा टेकड्या.

  4. पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.

  5. दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.

  6. पश्चिमेस : अरबी समुद्र.

 

राजकीय सीमा व सरहद्द :

  1. वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.

  2. उत्तरेस : मध्यप्रदेश.

  3. पूर्वेस : छत्तीसगड.

  4. आग्नेयेस : आंध्र प्रदेश.

  5. दक्षिणेस : कर्नाटक व गोवा

राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :

  1. गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुले

  2. दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक

  3. मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया

  4. छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली

  5. आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड

  6. गोवा : सिंधुदुर्ग

bottom of page