हवामान
भारताच्या पश्चिम भागात महाराष्ट्राचे स्थान असून भारता प्रमाणेच राच्याचे हवामान उष्ण करिसंधीम मान्सून प्रकारचे असून उष्ण उन्हाळे आणि अत्यंत थंड हिवाळा आहे मान्सूनच्या काळात अति पर्जन्यमान असते. राज्यात एका वर्षात चार ऋतुंचा अनुभव येतो. मार्च ते मे उन्हाळा ऋतू त्यानंतर जून ते सप्टेंबर पर्यत पावसाळा ऋतु असतो. मान्सूनचा माघारीचा काळ हा आॅक्टोंबर ते नोव्हेंबर, हिवाळा ऋतू डिसेंबर मे फेब्रुवारी ५.६.१.महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव टाकणारी प्राकृतिक वैशिष्ट्ये
.पश्चिम घाटाच्या टेकड्या उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेल्या असल्याने ठाणे, मुंबई, रायगड, रात्नागिरी व सिंधुदुर्ग हे पश्चिम किनारपट्टीचे जिल्हे उर्वरित महाराष्ट्रापासून वेगळे झालेले आहेत. समुद्रसपाटीपासून सरासरी उची १००० मी असल्याने हवामान वेगवगळया विभागात विभागले आहे.
. अरबी समुद्र हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस असून त्याचा प्रभाव कोकणाच्या तापमानावर झालेला आहे. असे दिसून येते की तपमान कक्षा कोकणात कमी तर समुद्रापासून ३८ अंतरावर असलेल्या प्रदेशात तापमान कक्षा ही जास्तआढळते. उदा. नागपूर.
. दुसरा महत्वाचा प्रकृतिक – प्रकार म्हणजे पठार होय. की जो दख्खनच्या पठाराचा भाग आहे.
तपामानातील बदल/तफावत
. भारतीय खंडापासून ते समुद्रापर्यतंच्या प्रदेशातील हवामानातील बदल हे महाराष्ट्राचे स्थान व प्राकृतिक रचना यावर अवलंबून असते.. कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यात अतिवृती/अति पाऊस परंतु सौम्य हिवाळा अनुभवास येतो.
. कमाल व किमान तपमानात बदल अनुक्रमे २७० से. आणि ४०० सें आणि १४० आणि २१० से असते.
. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमान हे कमी होत जाते. महाराष्ट्राचे वार्षिक सरासरी तपमान सर्वच भागात २५-२७०ण् पर्यंत राहते, विविध भागात एकूण वार्षिक तपामानात बदल जाणवत असतो.
महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण
महाराष्ट्रात पावसाळा हा ऋतू जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होतो आणि जूलै महिना पूर्ण ओला/आर्द्र प्रकारचा असतो. महाराष्ट्रात पर्जन्यमान हे प्रदेशानुसार विभिन्न पहावयास मिळतो. महाराष्ट्र राज्यात घाट माध्यावर पर्जन्यमानाची कमाल कक्षा हा ६००० मिमि. ऐवढी आढळते तर मध्य महाराष्ट्रात ती ५०० मि.मी पेक्षा कमी असते. किनारपट्टीच्या जिल्ह्यात कोकणातील उप-विभागांचा समाविश होतो. आणि पश्चिम घाटामध्ये अति पर्जन्यमान असते. घाटात ६००० मि मी पेक्षा जास्त पाऊस आणि मैदाना प्रदेशात २५०० मि मी एवढा पाऊस पडतो. घाटाच्या पूर्वेकडील उतारावर पर्जन्यमान वेगाने कमी कमी होत जाते आणि पठारी प्रदेशात पर्जन्यमान किमान असते (५०० मिमी पेक्षा कमी) पुन्हा आपण पूर्वेकडे जातो तसे पावसाचे प्रमाण वाढताना आढळते. जसे की मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेत हे विदर्भाच्या पूर्व भागात दुसर्यांदा १५०० मि.मी कमाल पाऊस होतो. अशा रीतीने मध्य महाराष्ट्रातील उप-विभाग कमी पावसाचे प्रदेश असलेले दिसून येतात. राज्यात प्राकृतिक नैऋत्य मान्सून च्या काळात हा पाऊस पोहचतो (जून ते सप्टेंबर) याच काळात कोकणात वार्षीक पर्जन्यमान हे बहुतेक ९४ पर्यत असते. याच ऋतु मध्ये महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या इतर उप-विभागात अनुक्रमे ८३ ८३, आणि ८७ पर्जन्यमान असते. यामध्ये कोकणात ७५ ते ८५ आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये ३० ते ४० दिवसात बदल जाणवतो. नैऋत्य मान्सूनच्या काळात विदर्भात एकूण साधारण ४० ते ५० दिवस पाऊस पडतो. भूगमातील पाण्याला कृत्रिम पध्दतीने विद्युत भारित करण्यामध्ये
पजन्यामानाची तीव्रता ही महत्वाची भूमिका असते. सर्वसाधारणपणे राज्याच्या इतर भागापेक्षा किनारपट्टीच्या आणि घाटाच्या प्रदेशात पर्जन्यमानाची तीव्रता जास्त असते. पर्जन्यमानाची तीव्रता ही वादळानुसार बदलते त्याच बरोबर मान्सून ऋतूच्या काळात कमी हाबाचा प्रदेश वाढल्यामुळे ही पर्जन्यमानात बदल होतो सर्व साधारणपणे संपूर्ण राज्यात वार्षीक पर्जन्यमानातील बदल हा जास्त जाणवतो. फक्त किनारपट्टीच्या प्रदेशात हा बदल २०ज पेक्षा कमी असतो. अन्यथा उर्वरित राज्यात २० ते ३५ज्ञ् च्या दरम्यान बदल आढळतो. उप- विभागाच्या आधारावर कोकणात वर्षिक पर्जन्यमानातील बदल हा कमीत कमी (२३ज्ञ्) असतो तर मराठवाड्यात तो जास्त जाणवतो (३१ज्ञ्) अनुक्रमे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हा बदल ३० ते २६ज्ञ् ऐवढा जाणवतो. राज्यात वार्षिक पर्जन्यमानातील ४००-६००० मि मी. च्या दरम्यान बदल असतोच आणि वर्षातील ३-४ महिन्यात हा बदल आढळतो महाराष्ट्रातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान खालील तक्यात दर्शविले आहे.
भौगोलिक प्रदेश वार्षिक पर्जन्यमान
कोकण किनारपट्टी ३००५ मि मी
मध्य महाराष्ट्र ९०१ मि मी
मराठवाडा ८८२ मि मी
विदर्भ १०३४ मिमी.
नकाशा १.२३ महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशातील वार्षिक पर्जन्यमान दर्शविते. पर्जन्यमानाच्या वितरणावर आधारित महाराष्ट्राची वेगवेगळ्या प्रदेशात विभागणी.
(अ) अति जास्त पर्जन्यामानचा प्रदेश - सह्याद्रि पर्वताचा पश्चिम उतार आणि पर्वतांच्या माथ्यावर अति जास्त पर्जन्य असतो. उदा. महाबळेश्वर (६२० सेमी), अंबोली (७५० सेमी) माथेरान (५२० सेमी).
(ब) जास्त पर्जन्यमानाचा प्रदेश -
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील किनारपट्टीलगत च्या भागात सुमारे २००-४०० से मी दरम्यान पर्जन्य होते. त्याच प्रकारे सह्याद्री पर्वताचा पूर्वेकडील उतार जसे की पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात सारख्याच प्रमाणात पर्जन्य होते.
(क) मध्यम पर्जन्याचा प्रदेश पश्चिम महाराष्ट्राचा अरुंद भाग ते पूर्व महाराष्ट्रात उत्तर - दक्षिण दिशेन आणि भंडारा, चंद्रपूर, गडभिरोली. जिल्ह्यात मध्यम पर्जन्यमान असते.
(ड) कमी पर्जन्यमानाचा प्रदेश - पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भाच्या काही भागात पर्जन्यमान असते म्हणून (५०-१०० सेमी) या गाट त्याचा समावेश होतो.
(ई) अति कमी पर्जन्याचा प्रदेश -
येथे पडणारे पर्जन्यमान एकदम तुंटपुट्या स्वरुपात व भरवशाचे नसते. आणि ५० से मी पेक्षा कमी प्रमाणात पर्जन्यमान असते. याचा परिणाम महाराष्ट्रातील दुष्काळ प्रवण प्रदेशावर होतो. सांगली जिल्ह्याचा भाग, सातारा, पुणे, अहमदनगर, आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश या प्रदेशात होतो.