top of page

महाराष्ट्राची प्राकृतीकरचना 

महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ.किमी

* २०११ च्या जनगणनेनुसार राज्याची ११,२३,७२,९७२ एवढी लोकसंख्या आहे.

* प्राकृतिक भू वैशिष्ट्येनुसार महाराष्ट्राचे तीन विभाग पडतात. म्हणजेच महाराष्ट्र पठार, सह्याद्रि रांगा आणि कोकण किनारपट्टी.

* प्रस्तर भंगामुळे दख्खनच्या पठाराची झीज होऊन पश्चिम घाट किंवा सह्याद्रि पर्वतरांग तयार झालेली आहे *सर्वसाधारणपणे सह्याद्रि पर्वतांची उंची १००० मी.

* पश्चिम घाटाच्या पश्चिमेस गुजराथ राज्यापासून ते थेट केरळ पर्यंत कोकण किनारपटीचा चिचोंळला पट्टा पसरलेला आहे.

* अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वंत रांग यांच्या दरम्यान कोकण वसलेले आहे.

महाराष्ट्रातील विविध विभाग

(१) कोकण - पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान पश्चिमेस असणार्या चिंचोळ्या किनारी प्रदेशाला कोकण म्हणतात. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, रत्नागिरी आणि चिपळूण हा महत्वाच्या प्रमुख शहरांचा समावेश कोकणात होतो.

(२) खानदेश - तापी नदीच्या खोर्याला लागून वायव्य दिशेला असणार्या प्रदेशाला खानदेश म्हणतात. जळगांव, धुळे आणि भुसावळ या प्रमुख शहरांचा या प्रदेशात समावेश होतो.

(३) देश- देश हा राज्याच्या मध्यवर्ती ठिकणी असणारा प्रदेश आहे. मराठा राज्यामधील असणारा हा अतिशय महत्वपूर्ण प्रदेश म्हणून या प्रदेशाकडे बघितले जाते. पुणे हे मराठा राज्यांच्या राजधानीचे ठिकाण आहे. नाशिक, या महत्त्वाच्या शहराचा समावेश या विभागात होतो.

(४) मराठवाडा- १९५६ च्या अगोदर हैदराबाद राज्याच्या राजपुत्राच्या असत्यारीखाली हा प्रदेश होता. सदरचा प्रदेश आग्नेय असून या प्रदेशातील औरंगाबाद हे मुख्य शहर आहे.

(५) विदर्भ - या प्रदेशाला पूर्वीच्या मध्यवर्ती प्रांत या नावाने प्रदेश हा ओळखला जायचा. या प्रदेशाचे स्थान हे अतिपूर्वेकडे आहे.

 

प्राकृतिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्याचे ३ नैसर्गिक विभाग होऊ शकतात.

(१) किनारपट्टीचा प्रदेश (कोकण) - समुद्राच्या लाटे प्रमाणे उंच सखल प्रदेशापासून कोकण किनारपट्टी बनलेली आहे.

(२) सह्याद्री किंवा पश्चिम घाट - जवळजवळ पश्चिमेस अरबी समुद्राला समांतर अशी दक्षिणोत्तर पसरलेल्या पर्वत रांगेला पश्चिमघाट असे म्हणतात.

(३) पठार - महाराष्ट्र पठारावरील प्रमुख डोंगररांगामध्ये शंभूमहादेवाचा डोंगर, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर आणि अंजिठा-सातमाळा यांचा सामावेश होतो. याशिवाय पुन्हा दख्खनच्यापठारी प्रदेशावरुन प्रमुख चार नद्यांची खोरी विभागली आहेत. त्यामध्ये कृष्णा नदीचे खोरे, भीमा नदीचे खोरे, गोदावरी नदीचे खोरे, आणि तापी-पूर्णा नदीचे खोरे यांचा समावेश होतो.

महाराष्ट्र राज्याची प्रमुख भू-वैशिष्ट्ये :

१. कोकण किनार पट्टी : पश्चिमेस अरबी समुद्र आणि पूर्वेच्या बाजूस असणार्या सह्याद्री पर्वत रांगा यांच्या दरम्यान असलेल्या चिंचोळ्या किनारपट्टीच्या प्रदेशाला कोकण किनारपट्टीचा प्रदेश असे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीची रुंदी केवळ/फक्त ५० कि.मी असून त्याच बरोबर २०० मीटर पेक्षा उंची कमी आहे. कोकण किनारपट्टी उत्तरेस अधिक रुंद असून दक्षिणकडे निमुळती होत गेलेली आढळते. भारताची प्राकृतिक वैशिष्ट्यामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीमध्ये असलेला महत्त्वाचा महाराष्ट्राचा किनारा आहे या किनार्यालाच कोकण किनारपट्टी या नावाने ओळखतात. उत्तरेस दमण गंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल खडीपर्यंत कोकणच्या उत्तर-दक्षिण विस्तार सह्याद्री पर्यंत रांगाच्या पश्चिमेस सुमारे ७५० कि.मी. आहे. कोकण किनारपट्टीचा प्रदेश हा सखल आहे परंतु तो मैदानी प्रदेश नाही. कोकणच्या दक्षिणेकडील सखल किनारपट्टीची रुंदी २० ते ४० किमी असल्याने सह्याद्री घाटाच्या पूर्वेस भू प्रदेशाचा तीव्र उतार सध्या अस्तित्वात आहे. म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे, कोकणच्या उत्तरेकडे असणार्या ठाणे जिल्ह्यात सखल किनारपट्टीची रुंदी सुमारे ८० ते १०० किमी असून उत्तरेकडे ती अधिक रुंद होत जाते. या प्रदेशातील सखल प्रदेशाचा भू उठाव हा कधी वरचढ करत तर विखुरलेल्या स्वरुपात असून असंख्य कमी उंचीच्या टेकड्या या प्रदेशात विखुरलेल्या स्वरुपात आढळतात.

             पश्चिम घाटाच्या पश्चिमेस असलेली किनारपट्टीचा प्रदेशात जेथे दोन पृष्ठभाग मिळतात. त्या तिरप्या /आडव्या उंचवट्या बरोबर आणि विच्छिन्न अवस्थेत असणार्या अनेक अरुंद टेकड्या आढळतात. किनारपट्टीच्या प्रदेशात काही ठिकाणी या प्रदेशाचा विस्तार होत जाऊन भूशिर, इंग्रजी  V आकाराच्या खाचा, समुद्र गुव्हा, आखात, उथळ जलमय किनारा आणि किनार्यापासून काही

अंतरावर बेटे अशी मांश्याच्या थव्या प्रमाणे विविध भूरुपे आपणास पहावयास मिळतात. नद्या, खाड्या आणि सह्याद्री पर्वताच्या उपरांगा, आदी किनार्याजवळ तुकडे तुकडे होऊन समुद्रकिनार्याला मिळाल्या आहेत. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात तेरेखोल, विजयदुर्ग, राजपुरी, रायगड, दाभोळ, धरमतर, ठाणे आणि वसईची खाडी आढळतात.कोकणातील नद्यांचा उगम सह्याद्री पर्वताच्या कड्यामध्ये होऊन प्राकृतिक रचनेनुसार आखुड परंतु वेगवान असून त्या अरबी समुद्राला मिळाल्या. त्यातील काही महत्वाच्या नदया म्हणजे उल्हास, सवित्री, वशिष्ठी, आणि शाली.  विशाल स्वरुपात असणारी दंतुर प्रकारची किनारपट्टी पार्श्वप्रदेश आपणास आता कोकणात पहावयास मिळतो.

(२) सह्याद्री पर्वंत रांगा -  महाराष्ट्रातील पश्चिम घाटालाच सह्याद्री पर्वत रांगा या नावानेही ओळखले जाते. या पर्वताची समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची १०००-१२०० मी ऐवढी आढळते. या पर्वंत रांगेचा विस्तार तापी नदीच्या मुखापासून ते दक्षिणेकडील राज्याच्या ही पलीकडे वाढत गेलेला आढळतो. सह्याद्री पर्वत रांगाच्या अनेक उपपर्वत रांगा त्याच्या मुख्य रांगेपासून अगदी पूर्वेकडे जाऊन सह्याद्रीच्या टेकड्या दक्षिणेकडे किनारपट्टीला समांतर जाताना आढळतात. उदा - सातमाळा, अंजिठा, हरिशचंद्र बालाघाट आणि महादेवाचा डोंगर रांगा.  सद्याद्री पर्वतांच्या पूर्व व अग्नेय दिशेकडे उतार हा मंद स्वरुपाचा खाली येताना आढळतो. पश्चिम घाट हा खर्या अर्थाने पर्वत नाही परंतु भ्रंशापासून दख्खनच्या पठाराची कडा तयार झाल्या आहेत. असे मानले जाते की १५० दशलक्ष वर्तापूर्वी गोंडवाना भूमीच्या विखंडनातून निर्माण झालेला आहे. या प्रदेशातील मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे त्र्यंबकेश्वराच्या टेकड्या, माथेरान व माथेरानचे पठार होय.

            इगतपुरी जवळ असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई जे १६५० (१६४६) मी उंचीवर आढळते. याशिवाय नासिकच्या उत्तरेस ९० किमी अंतरावर असलेले दुसरे उंच शिखर म्हणजे साल्हेर (१५६७) मी आहे. पश्चिमेकडे अनेक सुळके, व त्यांच्या रांगा निर्माण झालेल्या असून समुद्रात उतरलेल्या दिसतात. ही भूरुपे समुद्रामध्ये छोट्या टेकड्यांच्या खडकात गाभ्या प्रमाणे समुद्रात पसरलेली दिसतात. महाराष्ट्रातील बर्याचशा ह्या सहयाद्री पर्वतात उगम पावून नंतर त्या प्राकृतिक रचनेमुळे पूर्वेकडे व पश्चिमेस वाहत गेल्या. सह्याद्री पर्वत रांगेतील आणखी एक वैशिष्ट्ये/गुणधर्म म्हणजे या पर्वत रांगेत असलेले असंख्य घाट. त्यातील महत्वाचे घाट म्हणजे थळ, बोर, कुंमार्ली, अंबा, फोंडा आणि अंबोली. पश्चिम घाटात डोंगराळ भागात असणारे कमी उंचीचे प्रदेश आहेत म्हणजेच घाट होय. आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे या प्रदेशातील उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रमाणे थळ, बोर, कुंभार्ली, अंबा, फोंडा व अंबोली असे घाट आहेत.  पश्चिम घाटातील तीव्र उतारच्या टेकड्या ही एक परंपरा आहे; ठराविक काळानंतर टेकड्या दुंभगुन अरुंद रस्ते तयार झाले. बरीचशी महत्वाची थंड हवेची ठिकाणी ही याच घाटात आढळतात. भारतातील तीन पाणलोट क्षेत्रापैकी पश्चिम घाट हे एक महत्वाचे पाणलोट क्षेत्र आहे. की ज्यामधून दक्षिण भारतातील असंख्य नदया उगम पावतात. उदा. गोदावरी, भीमा, कोयना आणि कृष्णा.

महाराष्ट्र पठार -

            पश्चिम घाट व कोकण किनारपट्टीचा प्रदेश सोडून महाराष्ट्राचा उर्वरित भाग हा दख्खनच्या पठाराची भूमी असून ज्याचा अक्षवृत्तीय विस्तार व १५०४४' ते २१०४०' उत्तर – रेखावृर्तीय विस्तार ७३०७५' पू ते ६००३३' पूर्व अनुक्रमे आहे. कोकण किनारपटी आणि सह्याद्री पर्वंत रांगा सोडल्यास संपूर्ण प्रदेशाचा अंतर्भाव महाराष्ट्र राज्यात होतो.  महाराष्ट्र पठार हे सह्याद्रीच्या पश्चिमेपासून सुरुवात होऊन पूर्वेकडील नागपूर पर्यतचा पठाराचा उतार कमी होत जाताना आढळतो.  घाटामुळे महाराष्ट्र पठार हे कोकण किनारपट्टी पासून वेगळे झाले आहे.  सह्याद्री पर्वंत रांगेच्या पूर्वे पासून पसलेल्या सातमाळा, अंजिठा, हरिशचंद्र, बालाघाट व महादेव टेकड्या महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेकडे उंची नुसार एकाच दिशेने संपूर्ण महाराष्ट्रात पठार विखुरलेल्या आहेत. या रांगा दरम्यान गोदावरी, भीमा व कृष्णा नदीचे खोरी आहेत. महाराष्ट्र पठाराची विभागणी विविध घटकामध्ये झालेली आढळली ती पुढीलप्रमाणे -

(१) अंजिठा टेकड्या - गोदावरी नदीचे खोरे

(२) बालाघाट पठार - भीमा नदीचे खोरे

(३) महादेव डोंगर - कृष्णा नदीचे खोरे

            महाराष्ट्र पाठाच्या उत्तरेस सातपुडा रांग हा मुख्य भाग असून ती महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम दिशेने जाताना आढळते.

महाराष्ट्राचा उत्तर सीमेलगत नर्मादा नदी वाहत जाते. बाकीच्या प्रमुख नद्या त्यामध्ये कृष्णा, गोदावरी, भीमा, पेनगंगा-वर्धा आणि तापी-पूर्णा ह्या पठराला वळसा घालून त्यामध्ये बदल होऊन मोठ्या दर्या व डोंगरावर प्रदेश आढळतो.  ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी लाव्हारस थंड होऊन महाराष्ट्र पठाराचे वैशिष्ट्ये आणि प्राकृतिक रचना ही राज्याचे प्रभावी असे प्राकृतिक विशेष वैशिष्ट्ये आढळतात. वर्धा-वैनगंगा नदीखोर्याच्या पूर्वेकडील बराचस भाग आणि रत्नागिरीतील चिचोळपट्टा वगळून दख्खनचा पठाराचा उरलेला भाग बेसॉल्ट  खडकाने बनलेला आहे.

. पठारावरील महत्वाच्या पर्वंत रांगा.

. महादेव रांगेची शाखा ही मुख्य रांगेच्या सुमारे १८० उत्तरेस आणि आग्नेयकडे जाताना आढळते. 

. इतर रांगेमध्ये हरिश्चंद्र घाट हा पश्चिम भागाला लागून आहे त्याचबरोबर बालाघाट रांग ही पूर्वेस आढळते. 

. ह्या रांगेचा गुणधर्म असा की त्याच्या पठाराचा विस्तार हा त्याच्या माथ्याच्या बाजूस आढळतो.

. महाबळेश्वर आणि पांचगणीचे पठार हे महादेव टेकड्या लागून आहेत. तसेच अहमदनगरचे पठार हे बालाघाट रांगेला लागून आहे.

. हरिश्चंद्र घाटा रांगेच्या उत्तरेस, पश्चिमे पासून ते पूर्वेकडे जाताना निघालेल्या सलग टेकड्या म्हणजे अंजिठा रांग होय. या रांगेच्या पूर्वेकडच्या अगदी शेवटच्या ठिकाणी पुन्हा त्याची विभागणी दोन शाखेत होते. त्यातील एक शाखा दक्षिणेकडे पाभणी आणि नांदेड जिल्ह्यातून जाते तिला निर्मळ रांग म्हणतात. तर दुसरी उत्तरेकडील शाखा यवममाळ जिल्ह्यापर्यंत जाते या शाखेला सातमाळा डोंगर रांग म्हणतात.

. अंजिठा-सातमाळा रांगेच्या माभ्याला लागून परिघम विदर्भातील बुलाढाणा पठार आहे आणि मालेगावचे पठार हे सह्याद्री रांगेच्या अगदी जवळ आहे.

. सातपुडा रांग ही राज्याच्या उत्तरेकडील मर्यादेच्या बाहेरील बाजूला लागून असून त्याच्या तीव्र तुर्यासारखी रांग ही धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेस आढळते. आणि गाविलगडचा टेकड्या अमरावतीच्या उत्तर भागात आढळतात.

. तोरणमाळ हे लहानसे पठार असून त्याची उंची ११५० मी आहे.

. अस्तंबा डोंगर हे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची १३२५ मी असून येथून तापी नदीचे खोरे पूर्ण दृष्टीक्षेत्रात येते.

. या रांगेचा दक्षिणेकडील उतार सुमारे १२०० मी पासून ते ३०० मी पर्यंत आकस्मिकपणे कमी होताना आढळतो.

. या रांगेतील कडे ईशान्यकडे जाताना दिसतात.

. अती तीव्र उताराच्या कड्यांच्या रांगामुळे या पर्वतरांगाची निर्मिती झालेली आहे.

bottom of page