top of page

प्रस्तावना 

या प्रकरणामध्ये आपण महाराष्ट्रातील शेती जी प्रामुख्याने नेऋत्य मौसमी पावसावर अवलंबन आहे. विविध हवामानातील पीक पध्दती यावर खालील प्रकरणात चर्चा केली आहे. विशेषत: राज्यातील पशुधन संसाधन सुध्दा विचारात घेतले आहे. मत्सव्यवसायाचे वितरण, याच्या समस्या आणि उपाययोजना यावर सुध्दा चर्चा करण्यात आली आहे. या व्यतिरीक्त तुम्हाला राज्यातील खनिजे आणि उर्जा संसाधनाचासुध्दा अभ्यास करावयाचा आहे.

शेती म्हणजे पीकांचे उत्पादन, पशुपालन किंवा कुकुटपालन

जरी महाराष्ट्र हे जरी अति उदयोगप्रधान राज्य असले, तरी शेती व्यवसाय हा एक प्रमुख उद्योग परंपरागतरीत्या चालत आलेला आहे.

         या राज्यात मुख्यत्वे करुन भात, ज्वारी, बाजरी, गहू, तूर, भूग, उडीद, हरभरा आणि इतर (कडधान्ये मुख्यत्वेकरुन प्रमुख आहेत. भूईमूग, सुर्यफूल, सोयाबीन ही मुख्य तेलबीयाणे आहेत. महत्वाची नगदी पीके कापूस, ऊस, हळद आणि भाजीपाला होत. जळगावातील कापूस हे मुख्य पीक आहे. या राज्याचा विस्तार आकाराने मोठा आहे, फळबाग पिका मध्ये आंबा, केळी, द्राक्षे, आणि संत्री मुख्य आहेत.

 

शेतीची वैशिष्ठे

जरी महाराष्ट्र हे अतिशय उद्योगप्रधान राज्य असले. तरी पूर्वीपासूनच शेती हा येथीललोकांचा मुख्य व्यवसाय आहे.

• महाराष्ट्रातील २/३ लोक हे प्राथमिक व्यवसायात गुंतलेले आढळून आलेले आहे.

• जवळजवळ ६५ % महाराष्ट्रातील कामगार हे शेती आणि त्यासंबंधीत निगडीत कामांवर अवलंबून आहेत.

• महाराष्ट्राती शेती ही मुख्यत्वेकरुन महत्वाचे उपजिवीकेचे साधन आहे.

• दोन्ही प्रकारची अन्नधान्याची पिके आणि नगदी पीके या राज्यात घेतली जातात.

• बरीचशी शेतीची जमीन ही पावसावर अवलंबून आहे, विशेषत नैऋत्य मौसमी पावसावर, जून ते सप्टेंबर दरम्यान, पडणारा हा पाऊस विषेशत: पिकासाठी आणि राज्यातील जनजीवनासाठी महत्वाचा असतो.

• महाराष्ट्राचे शेतीविषयक नियोजन आणि भारतातील इतर भागातील नियोजनावर पर्जन्याचा प्रभाव दिसून येतो.

• शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून कमी रहावी यासाठी जलसिंचनाच्या सुविधा वाढवण्यात आल्या आहेत.

• भारतामध्ये धरणाची संख्या जास्त असून सुध्दा, जलसिंचन १६ % शेतजमिनी एवढे आहे.

• येथे जमिनीची उत्पादन क्षमता कमी आहे.

• महाराष्ट्रातील ६०% क्षेत्र हे लागवडीखाली आहे आणि पूर्वेकडील वैनगेना खोर्यातील आणि पश्चिमेकडच्या सह्याद्रीचा विभाग हा अर्ध्यापेक्षा अधिक शेतीक्षेत्राखाली आहे.

• गोदावरी, कृष्णा, भीमा नदीच्या खोर्याचा बराचसा भाग हा शेतीच्या मशागतीच्या खाली आहे.

• असमतोल भूप्रदेश, पठारावरील अपुरा पाऊस, मृदेचा पातळ थर हा जास्त भूप्रदेशात आढळतो आणि सिंचनाच्या अपुर्या सुविधा फक्त ७ ते १०% जमीन सिंचनाखाली असल्यामुळे उपन्न कमी मिळते हीच वस्तुस्थिती आहे कि ऊसाचे उत्पन्न सोडले तर पिकांचे राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे.

• महाराष्ट्रातील मुख्य पिके गहु, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि डाळी आहेत.

• नगदी पिकांमध्ये भूईमूग, कापूस, उस, हळद आणि तंबांखूचा समावेश होतो.

• मुख्य फळपीके आंबा, द्राक्षे, केळी, संत्री.

• राज्यातील १२.९० लक्ष हेक्टर क्षेत्र हे आंबा, केळी, संत्री, द्राक्षे, काजू इत्यादी फळपिकाच्या क्षेत्राखाली आहे.

• नगदी पीक किंवा कापूस लागवड जास्त करुन राज्यात शेतकर्यांच्या सहकारी मालकीचे आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच साखर उत्पादन हे स्थानिक सहकारी संस्थामार्फत घेतले जाते.

• संपूर्ण लागवडी योग्य क्षेत्रामधून ७० % क्षेत्र अन्नधान्यपिके आणि ३०% क्षेत्र तेलबिया, कापूस आणि इतर तंतू आणि चारायुक्त पिकांनी व्यापले आहे.

bottom of page