महाराष्ट्रातील पशुधन
शेतीत प्राणी ही संपत्ती समजली जाते. पाळीव प्राणी म्हणजेच पशुधन जे शेतीवर आधारित असतात ते अन्न, तंतू किंवा कष्टाच्या कामास उपयुक्त, शेतीत पूरक वरील संपदा निर्माण करते. गुरेढोरे, मेढ्या, बकर्या, धोडे, डुकरे आणि कोंबड्या यांचा समावेश पशुधन म्हणुन उपयुक्त जनावरांमध्ये होतो. महाराष्ट्रामध्ये पशुधन हे ग्रामीण जनतेची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. मुख्य प्राणी संपदा म्हणजे गुरे म्हशी, मेढ्या, बकर्या, घोडे, डुकरे आणि कोंबड्या आहेत.
(१) गुरे
* महाराष्ट्रात अतिशय निकृष्ट दर्जाची गुरे आढळतात.
* सरासरी गायीच्या दुधाचे उत्पादन दरदिवशी एक लिटर आहे तर प्रगत देशामध्ये जसे कि नेदरलॅन्ड आणि डेन्मार्क मध्ये जवळ जवळ दरदिवशी ३० ते ४० लिटर दुधाचे उत्पादन होते.
* याच कारणासाठी भारतींय गायींना tea-cup-cow म्हणून संबोधण्यात येते.
* सिंधी जातीची गायी महराष्ट्रात आढळून येतात.
* म्हशी हे महाराष्ट्राती दुधाचे मुख्य स्त्रोत आहे.
(२) मेंढ्या
* महाराष्ट्रात मेंढ्या ह्या मटनासाठी पाळल्या जातात लोकरीसाठी नाही.
(३) बकरी
* बकरीला गरीब माणसाची गाय म्हणून ओळखले जाते.
* ग्रामीण भागात जवळ पास सर्वच घरात बकर्या आढळतात.
* 'देशी' प्रकारच्या बकर्या महाराष्ट्रात असतात.
(४) घोडे, डुकरे, गाढव हे सुध्दा येथे पहायला मिळतात.
गुरांपासुन उत्पादान
* आपल्या जीवनास आवश्यक असे बरेचसे उत्पादन गुरे आपल्याला पुरवत असतात.
* पशुधनापासुन मिळणारे उत्पन्न देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवतात म्हणूनच पशुधन हे सुध्दा आर्थिक उत्पन्नात महत्वाची भूमिका विभावत (बजावत) असतात.