महाराष्ट्राची लोकसंख्या
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुसर्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणार्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३७० कि.मी.२ इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.८३ कोटी पुरुष व ५.४० कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९४६ महिला इतका आहे. ८२.९% लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते. इंग्लिश सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोकणी, कोळी, कोंकणी, मालवणी व विदर्भात वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत. राज्यात ७०.२% हिंदू, १५% बौद्ध, १०.६% मुस्लिम, १.३% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत.
-
महाराष्ट्राची लोकसंख्या व साक्षरता
-
महाराष्ट्रातील लोकसंख्या (२०११ जनगणनेनुसार )
-
एकूण लोकसंख्या - ११,२३,७२,९७२
-
पुरुषांची संख्या -०५,८३,६१,३९७
-
स्त्रियांची संख्या - ०५,४०,११,५७५
-
लोक संख्येच्या प्रतिवर्षीवाढीचा दर - २.१४%
-
१,००० पुरुषांमागे स्त्रियांची संख्या - ९२५ स्त्रिया
-
घनता (दर चौ.कि.मी.) - ३६५ व्यक्ती
-
साक्षरता - ८२. ९१%
-
स्त्रिया साक्षरता - ७५.४८ %
-
ग्रामीण लोकसंख्या - ५,५७,७५,०००
-
टक्केवारी - ५७. ६०%
-
शहरी लोकसंख्या - ४,११,०१,०००
-
टक्केवारी - ५७. ६०%
-
शहरी लोकसंख्या - ४,११,०१,०००
-
टक्केवारी - ४२. ४०%
-
जन्मदर हजारी - १८.५
-
मृत्युदर हजारी - ६. ५
-
राज्यातील संपूर्ण साक्षर जिल्हा (पहिला) - सिंधुदुर्ग
-
राज्यातील सर्वात कमी साक्षर जिल्हा - नंदुरबार
-
लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त दर – ठाणे
-
रत्नागिरी जिल्ह्यात १००० पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त ११३५ आहे. मुंबई शहर जिल्ह्यात १००० पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण सर्वात कमी ८२० स्त्रिया आहेत.
-
लोकसंख्या वाढीचा सर्वात कमी दर – सिंधुदुर्ग
-
सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा - मुंबई उपनगर
-
सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा - नंदुरबार
-
सर्वाधिक लोकसंख्येची घनतेचा जिल्हा - मुंबई शहर
-
सर्वात कमी लोकसंख्येची घनतेचा जिल्हा - गडचिरोली
-
सर्वात अधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
-
सर्वात अधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा – नंदुरबार
लोकसंख्या वाढ
भारतात २० व्या शतकात लोकसंख्या वाढीचे खालील तीन ढोबळ टप्पे केले जावू शकतात
१९०१ ते १९२१ स्थिर लोकसंख्या
१०२१ ते १९८१ जलद वाढ
१९८१ ते २००१ जास्त वाढ परंतु निश्चितपणे कमी वाढीकडे वाटचाल
भारतातील लोकसख्ंया वाढ ही लोकसंख्या संक्रमण सिध्दांताप्रामणे झालेली आहे १९ व्या शतकाच्या दरमयान कमी किंवा अधिक प्रमाणात भारताची लोकसंख्या बदलत होती आणि त्यातूनच तिची स्थिर वाढीकडे वाटचाल सुरु होती जी १९२१ पर्यंत होती. त्यानंतर मात्र लोकसंख्या संक्रमाणाच्या सर्व अवस्था यशस्वीपणे पूर्ण करत भारत सध्या संक्रमाणाच्या पाचव्या अवस्थेमध्ये पाहोचला आहे ज्यामध्ये वेगाने जन्मदरात घट होत आहे.
भारताची लोकसंख्या 1991-2001 च्या दशकात 180दशलक्ष इतक्या प्रचंड प्रमाणात वाढली खरे पाहता प्रत्येक दशकामध्ये लोकसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत गेली असली तरी त्यामध्ये 1961 पासून निश्चित असा लोकसंख्येचा घटता कल दर 1981 पेक्षा दिसत आहे 1981 ते 1991 आणि 1991 ते 2001 च्या दशकांमदरमयान 17.6 दशलक्षाने घटली यावरुन असे सिध्द होत की, भारतामध्ये लोकसंख्येची वाढ होत असली तरी त्याचा वेग मात्र कमी कमी होत आहे.
1991-2001 च्या मधील दशवार्षिक लोकसंख्या वाढीची टक्केवारी ही स्वातंत्रयानंतरची सर्वात कमी वाढ दर्शवणारी आहे 1981 ते 1991 च्या दशकामध्ये असणारी 23.86 टक्के लोकसंख्या वाढ 1991-1991 च्या दशकामध्ये असणारी 23.86 टक्के लोकसंख्या वाढ 1991-2001 च्या दशकामध्ये 21.34 टक्के पर्यंत कमी झाली म्हणजेच 2.52 टक्कयांनी घट झाली सरासरी लोकसंख्या वाढीचा दर हा 2.14 टक्के वरुन 1.93 टक्के पर्यत कमी झाला आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 96 लशलक्ष असून उत्तर प्रदेशानंतर हे दुस-या क्रमांकाचे राज्य आहे २० व्या शतकामध्ये महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षाही वेगाने वाढत गेली आहे. मागच्या दशकामध्ये 1901 ते 2001 लोकसंख्या वाढीचा दर 1.23 टक्यांनी भारताच्या वाढ दरापेक्षा जास्त होता. सुरवातीला महाराष्ट्र राजयाला लोकसंख्या दुप्पट होण्यासाठी 60 वर्षे लागली परुतू नंतर मात्र 40 वर्षच लागली महाराष्ट्राची लोकसंख्या 2.5 पटीने वाढली गेल्या 40 वर्षामध्ये राज्यातील लोकसंख्या 5 टप्प्यामध्ये वाढली सर्वसाधारणपणे राज्यातील वाढीचा दर मागच्या दशकामध्ये 3.6 टक्कयांनी वाढली आहे.
२. जास्त लोकसख्ंया वाढीची कारणे
भारतामध्ये लोकसंख्या विस्फोट होण्यामागे खालीलपैकी एक किंवा अनेक कारणे असू शकतात.
-
निरक्षरता आणि जाग़तीची करमतरता ही काम कमी वर्गाची समस्या आहे कुटूंबाकतील सदस्यांची संख्या जेवढी जास्त तेवढी कुटूंबामध्ये काम करण्याचे हात जास्त अशी समजूत आसते.
-
नागरी केंद्रामध्ये विशिष्ट वर्गाची आर्थिक भरभराट झाल्याचे आढळले आहे आणि भारत हा जगातील एक मोठा मध्यमवर्गीय लोकांचा देश बनला आहे. त्याचा परणिाम म्हणून देशाच्या ब-याच मोठया भागात मोठया कुटूंबाची पारंपारिक विचारसरणी स्विकारली जाते.
-
कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवताना जास्तीत जासत भर स्त्रियांवरच दिला असून पुरुषांना त्यांच्या जाबादारीची जाणीव कोणत्याही प्रकारचे शिक्षण दिले जात नाही.
-
बालविवाहासारखे सामाजीक प्रश्न
-
अनेक धर्मिक लोक कुटूंब कल्याण कार्यक्रमाची क्लपना ही धार्मिक भावनांचा अनादर करणारी मानतात. आणि त्याचे मुळ हे पाश्चिमात्य विचारांचे आहे.
-
काही धर्म मुलींच्या विरोधात असल्याने मुलांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहन देतात.
-
शिक्षणाच्या कमतरतेमुळे जास्त लोकसंख्योमुळे काय परिणाम होतील याविषयी त्यांना जाणीव करुन देण्याची गरज आहे.
-
बहुतेक गरीब लोकांजवळ कुटुंबनियोजनाची आवश्यकसाधने नसल्याने त्यांचे कुटूंब मोठे असते.
-
गरीब लोकांना असे वाटते की जेवढी जासत मुले तितक्या जास्त प्रमाणात घरी पैसा येईल.