महाराष्ट्र राज्यातील मासेमारी
* भारतातील किनारपट्टीच्या राज्यात मासेमारी हा एक प्रमुख व्यवसाय आहे आणि महाराष्ट्र हे किनारपट्टीवरील राज्य असल्यामुळे यास अपवाद नाही.
* अन्न आणि शेती संघटना (Food and Agriculture Organization) च्या जागतीक संघनेनुसार हे भारतातील १९९० ते २०१० दरम्यान मत्स्यउत्पादन हे दुप्पट झाले आहे.
* भारतातील जवळ जवळ १४ दशलक्ष लोक या व्यवसायात गुंतलेले आहे. मासेमारी उत्पादनात भारतात महारष्ट्राचा पाचवा क्रमांक लागतो 2014-15 या वर्षाच्या मिळालेल्या माहितीनूसार महाराष्ट्रात मासेमारीचे एकूण उत्पादन 556,450 मेट्रिक टन एवढे आहे
मासेमारी समस्या
अतिमासेमारी, शहरीकरण, घरगुती आणि औद्योगिक प्रदूषण आणि पर्यावर्णाची अवनती या सर्व कारणांमुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपासून महाराष्ट्रात मत्सव्यवसायाला बर्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
* भारतातील सुमारे १० दशलक्ष गरीब कोळी लोकांची पौष्टिक खाद्य व अर्थिक सुरक्षिततेसाठी नद्या हे महत्वपूर्ण आहेत. भारतभर मच्छमारीचे क्षेत्र कमी होते आहे. नदीतील मच्छमारी जुनी असून त्याचे महात्व हळूहळू कमी होत आहे. त्याबरोबर कृत्रिम मच्छीमारी व सागरी मच्छीमारी यामध्ये वाढ होत आहे.
* अतिमासेमारीमुळे बर्याचश्या प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
* पापलेट आणि बोंबील यासारख्या प्रजाती यांचे अतिमासेमारीमुळे या प्रजाती राहतील कि नाही यात शंका आहे.
* मासेमारीतील माश्याच्या संख्येत घट होण्याची मुख्य कारणे खालील प्रमाणे -
* आधुनिक सामग्रीचा मासेमारीसाठी वापर - आधुनिक मासेमारीतील जाळे हे अतिशय लहान मासेसुध्दा पकडतात ज्याला व्यापारीदृष्ट्या काहीच किंमत नसते या कृतीमुळे माशांच्या वाढीच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
* मासेमारी वर्षभर चालते - परंतु मासेमारी ही वर्षभर चालते ज्याचा विपरीत परिणाम मत्स्यप्रजोत्पनावर आणि त्याच्या जीवनचक्रावर होतो.
* माशांचा आणि सागरी जीव मृत्यू - मासे आणि सागरीय जीव यांचा मृत्यू हा प्रदुषण वाढल्याने, आणि तेलगळती आणि अपघात यामुळे तेलाचा तवंग पाण्यावर परसल्याने होतो.
* बरेचसे मच्छीमार हे गरीब असतात आणि आधुनिक सामुग्री मासे पकडण्यासाठी घेवू शकत नाही.