top of page

लोकसंख्येची रचना, वय आणी लिंग दर्शक

 

        लोकसंख्या अभ्यासामध्ये वयोगट अभ्यासाला महत्वाचे स्थान आहे त्याच्या अभ्यासामुळे आपल्याला जन्मदर,  मृत्यूदर आणि मनुष्यबळ इत्यादी विषयी महिती मिळते. हयाचा विशेषकरुन उपयोग हा लग्न, वयोगट, निवृत्तीचे वय रोजगार रचना, उपलबध मुनष्यबळ जे शिकण सैन्यदल जीवनवीमा इत्यादी मध्ये महत्वाचे आहे.

 

         वय आणि लिंग दर्शक मनोरा ही थोडया थोडया अंतराने वयोगट रचनेचे विश्लेषण करण्यासाठी वापरली जाणारी साधारण पध्दती आहे. वय लिंग मनो-यावरुन विविध वयोगटातील लिंगसरचना कशी आहे हे समजते सर्वसाधारणपणे लोकसंख्येचे तीन ठळक विभागात वर्गीकरण केले जाते. तरुण प्रौढ आणि वृध्द हया गटांची विभागणी १५ आणि 60 वर्षानी वेगळी केली जाते. तीन ठळक वयोगट म्हणजे ० ते १४,१५ ते ५९ आणि ६० पेक्षा जास्त असते हे वयोगट म्हणजे प्रदेशातील लोकसंख्येमधील सामाजिक आणि आर्थिक चित्र असते.

      वयोगट रचनेमुळे भारतासारख्या विकसनशील देशांच्या नियोजनाला मदत होते.

लिग गुणोत्तर

     

          लोकसंख्येच्या लिंग रचनेतील संख्येच्या मोजणीला लिंग गुणोत्तर म्हटले जाते  लिंग गुणोत्तर हे एकूण लोकसंख्येतील स्त्री पुरुषांची संख्या दर्शविते हया प्राकरचा अभ्यास हा आर्थिक आणि सामाजिक दुष्टीकानातून उपयोगी पडतो प्रगत समाजामध्ये स्त्री पुरुष संख्या समान असते तर असमान स्त्री पुरुष प्रमाणामुळे समाजामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. लिंग गुणोत्तर हे जनमदर मृत्यूदर, स्थलांतर आणि युध्दे यावर अवलंबून असते.

 

             लिंग गुणोत्तर दर हजार पुरुषांमध्ये असणा-या स्त्रियांची संख्या किती यावरुन काढले जाते. स्त्रियांकडे केलेले दुर्लक्ष आणि प्रसुतीकाळातील जास्त मर्त्यता हे पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण कमी होण्यास कारणीभूत आहे. लिंग गुणोत्तर प्रदेशानुसार बदलते तसेच ते ग्रामीण नागरी भागात आणि सामाजिक धार्मिक घटाकांनुसारही भिन्न असते. …..

bottom of page