प्रस्तावना
राज्याचा अर्थिक विकास हा औद्योगिक विकासाची पातळी यांच्याशी थेट जोडला जातो. हे सर्वाना ज्ञात आहे. स्वातंत्र्यापूर्वी महाराष्ट्रात औद्योगिक दृष्ट्या विकास कमी होता. परंतु सध्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात १३ टक्के योगदान सध्याच्या महाराष्ट्राचे आहे. शेती आणि संबंधीत व्यवसायात ६४.१४ टक्के लोक काम करतात आणि जवळजवळ ४६ मध्ये उद्योगधंद्याचे योगदान दिले आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला औद्योगिक शहर असे म्हणतात. राज्यात औद्योगिक विकास मुख्यत्वे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीत झाला आहे. कापड गिरण्या, रसायने, यंत्रसामुग्री, इलेक्ट्रीकल, वाहतूक आणि धातू शुध्द करण्याचा उद्योग हे जिल्ह्यातील सहा महत्वाचे उद्योग आहेत. हे या उद्योग धंद्यामध्ये रोजगार देणार्या मुंबईतील असंख्य लोकांचा सिंहाचा वाटा आहे.
भारतीय द्विपकल्पामधील महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य असून भारताच्या एकूण साखर उत्पादनाच्या सुमारे १/४ उत्पादन भाग एकट्या महाराष्ट्रातून घेतले जाते. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर ही साखर उत्पादनाची प्रमुख केंद्रे आहेत. औषध निर्माण, पेट्रोकेमिकल्स, जड रसायने, इलेक्ट्रॉनिक, मोटारी अभियांत्रिकी, अन्न प्रक्रिया आणि प्लास्टिक इ. राज्यातील काही प्रमुख उद्योगधंदे छोट्या प्रमाणावरील उद्योगधंदे मोठ्या मार्गाने २६७४५२ किमी संपूर्ण राज्यात विखुरलेला आहे. देशात महाराष्ट्र राज्य हे रस्ते वाहतूकी विषयी मोठे आहे. महाराष्ट्राच्या शेजारील सहा राज्ये राष्ट्रीय महामार्ग क्रं. १७ यांच्यामार्फत जोडलेली आहेत. महाराष्ट्राचे राज्य महामार्गाचे जाळे विकसित झाले असून त्याची एकून लांबी ३६८८ कि मी एवढी आहे.
प्रमुख औद्योगीक विभाग
(१) मुंबई -ठाणे औद्योगिक विभाग -
ठाणे, घाटकोपर, भांडूप, मुलुंड, कुर्ला, उल्हासनगर, अबंरनाथ, कल्याण आणि भिवडी, निझामपुर, चेंबूर, वाशी, पनवेल नवी मुंबई हे या विभागाचे औद्योगिक केंद्र आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आौद्योगिक पट्टा आहे. कापड आणि चित्रपट उद्योग हा येथील उद्योगधंद्याचा मुख्य उद्योग आहे.
या उद्योगधंद्याच्या विकासाची या विभागाची मुख्य कारणे खालीलप्रमाणे.
(१) ब्रिटीशाच्या काळापासून या उद्योगधंदयाची सुरवात झालेली आहे.
(२) ब्रिटीशांच्या काळापासून मुंबईचा मुख्य आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकास झालेला होता. मुंबई हे उर्वरित महाराष्ट्रास आणि भारतास रस्ते आणि रेल्वेने जोडले गेले असून ज्याचा उपयोग तयार झालेले उत्पादन आणि कच्चा माला निर्यात करण्यासाठी होतो. ह्या पायाभूत सुविधामुळे उद्योगधंदयाच्या विकासासाठी मुंबईच्या आणि आजुबाजुच्या परिसराच्या विकासासाठी मदत होते.
(३) मुंबईच्या औद्योगिक विकासाची सुरुवात दुसर्या जागतिक महायुध्दाच्या काळात झाली. त्या काळात मुंबई बंदरातुन निर्यात ही युध्दामुळे थांबली होती.
(४) मुंबईला महाराष्ट्रातून कोकण आणि देश या विभागातून कुशल आणि अकुशल कामगार मिळतात.
(५) या भागास विद्युत पुरवठा हा खोपोली, मीरा आणि भिवपुरी या विजक्रेंद्रातून होतो.
(६) उदयोगधंदयाच्या विकासाठी आवश्यक असलेले भांडवल गुजराती, पारशी समुदायाचे लोक मोठ्या प्रमाणात गुंतवतात.
(७) या विभागात अतिशय विकसीत, वाहतूक सुविधा जसे की रस्ते, रेल्वे, हवाईवाहतूक आणि बंदरे ज्यामुळे या विभागाचा विकासास हातभार लागला आहे.
(८) मुंबई हे महत्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर असून जे मोठ्या प्रमाणावर सोयीसुविधांनी मुक्त आहे.
(९) त्याचा परिणाम म्हणून ब्रिटीशांना मुंबईत संपर्क करणे आणि आधुनिक सुविधा आणि यंत्रसामुग्री आणणे सोपे झाले.
(१०) मुंबई (बॉम्बे) हे महत्वाचे प्रशासकीय क्रेंद्र ब्रिटीशाच्या काळात होते आणि त्याचे महत्व स्वातंत्र्योत्तर काळात वाढतच गेले.
(११) मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. बर्याचश्या बँका, विमा कार्यालये आणि इतर आर्थिक संस्था या विभागात पहावयास मिळतात.
(१२) मुंबईमध्ये जागेच्या अभावी औद्योगिक विकास हा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गा बरोबर म्हणजे कुर्ला, भांडूप, मुलुंड, विक्रोळी, ठाणे, पनवेल, उरण आणि नवी मुंबई अशा ठिकाणी झाला आहे.
मुंबई-ठाणे विभागातील मुख्य उद्योग :
(१) विद्युत उपकरणे (२) कार (गाड्या) (३) सायकली (४) शुध्दीकरण कारखाने (५) साबण (६) तेल
(७) हातमाग (८) खते (९) रबर (१०) प्लास्टीक (११) काच (१२) रसायने (१३) सुती, रेशमी, लोकरीच्या कापड्याच्या गिरण्या (१४) ॲसिड (१५) चित्रपट उद्योग
(२) पुणे-पिंपरी-चिंचवड औद्योगिक विभाग -
१) पुणे-पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्र हे आशियातील सर्वांत मोठे औद्योगिक क्रेंद्र म्हणून समजले जाते, येथे औद्योगिकरण १९५४ साली चालू झाले होते.
2) पिंपरी-चिंचवड ही छोटेसे शहर पुणे जिल्हाच्या नगरामध्ये आणि पुणे शहराच्या वायव्येस वसलेले आहे. यावर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे शासन चालते. चिंचवड, पिंपरी, निगडी, निगडी प्राधिकरण, ताथवडी, तळवडे, आकुर्डी, भोसरी, अजमेरा कॉलनी, संभाजी नगर, नेहरु नगर, सांगवी, हिंजवडी, औंध, वाकड हे क्षेत्र पिंपरी चिंचवड मध्ये आहे.
औद्योगिक क्रेंद्र -
पुणे, खडकी, देहू रोड, पिंपरी, चिंचवड, हडपसर, भोसरी, उरळी कांचन, चाकण, पिराणगु इत्यादी.
या विभागातील औद्योगिकरणाच्या विकासाची मुख्य कारणे
(१) हा विभाग मुंबई औद्योगिक पट्ट्यास रेल्वे आणि नवीन महामार्गानी जोडलेले आहे म्हणून वाहतूक जलद आणि कार्यक्षम आहे.
(२) परंतु पिंपरी आणि चिंचवड हे पुणे मुंबई महामार्गानी रस्त्याशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.
(३) पुणे हे मध्यवर्ती ठिकाण असून रस्ते आणि रेल्वे एकाच ठिकाणी मिळतात.
(४) उर्जा स्तोत्र सहज उपलब्ध आहे.
(५) डेक्कन एज्यूकेशन सोसायटी आणि सिबा@यसिस या व इत्यादी सारख्या पुण्यात बर्याच शिक्षण संस्था आहेत. आताच्या संस्थामध्ये माहिती तंत्रज्ञानातील प्रवीण तज्ञाच्या उपलब्धतेची खात्री देतात. म्हणूनच माहिती तंत्रज्ञान उद्योग येथे फोफावला आहे.
(६) कुशल आणि अकुशल कामगार येथे उपलब्ध आहेत.
(७) बर्याचश्या संशोधन प्रयोगशाळासुध्दा येथे आहेत.
मुख्य उद्योगधंदे
(१) अभियांत्रिकी (२) धातू (३) वाहतूक सामुग्री (४) विद्युत सामुग्री (५) कापड उद्योग (६) औषधनिर्मिती
(७) रसायने
(३) औरंगाबाद जालना औद्योगिक विभाग -
औद्योगिक क्रेंद्र
1) औरंगाबाद, वैजपूर, पैठण, कन्नड, जालना, अबंड, पारतुर, वाळूंज, आणि चिखलठाणा.
औद्योगिकरणाच्या विकासाचे या विभागातील मुख्य घटक.
(अ) पाण्याची उपलब्धता
(ब) कुशल आणि अकुशल कामगार येथे सहज उपलब्ध होतात.
(क) जायकवाडी वीज क्रेंद्रातून पाण्याचा पुरवठा.
(ड) कमी किंमतीत मोठे जमीनीचे क्षेत्र उपलब्ध.
(इ) शेतीचा विकास या भागाचा चांगल्या प्रकारे झालेला आहे. म्हणून शेतीवर आधारिक उद्योगधंद्याच्या विकासासाठी येथे खूप वाव आहे.
(ई) मागील काळास हा विभाग अविकसित असल्याने शासनाने या विभागास जादा सोई पुरविल्या आहेत.
उद्योगंधदे
(१) कापडउद्योग - खास पध्दतीची पैठणी येथे विणली जाते. पैठणी या विभागातील प्रसिध्द साडी आहे.
(२) साखर उद्योग (३) हातमाग (४) तेल गिरण्या (५) मोती (६) लाकडाच्या वखारी (७) स्कूटर (८) मशिनरी
(९) रसायने (१०) औषध निर्मिती (११) स्टीलची भांडी (१२) दुरदर्शन संच (१३) प्लास्टिक (१४) सिमेंट पाईप
(१५) सुटकेस (बॉगा )
(४) नागपूर औद्योगिक विभाग -
औद्योगिक केंद्रे
* नागपूर, कामटे, कम्हन, हिंगाना, कटोल, कमलेश्वर
या विभागातील विकासाची मुख्य वैशिष्ट्ये
1) नागपूर आणि भंडारा जिल्हातील खाणीमुळे विविध प्रकारची खनिजे येथे उपलब्ध झाली
आहेत
2) खापरखेडा आणि कोरडी औष्णिक उर्जाकेंद्रातून विजेची उपलब्धता आहे. नागपूर हे भारतातील मध्यवर्ती ठिकाण आहे. रस्ते, रल्वे आणि हवाई मार्ग येथे येवून मिळतात.
उद्योगधंदे -
(१) कापडउदयोग (२) औषधनिर्मिती (३) प्लास्टिक (४) पेपर (५) खते (६) साखर (७) जड उद्योग - युध्द सामग्री (८) बिडी (९) रसायने (१०) खाणकाम (११) सिमेट (१२) दुरदर्शन संच
(५) नाशिक औद्योगिक विभाग
औद्योगिक्रेंद्र
नाशिक, नाशिक रोड, ओझर. या विभागात औद्योगिकीरणाच्या विकासाची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
1) नाशिक हे भारतातील मध्यवर्ती नोडल क्रेंद्र आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई रस्ते येथून जातात.
2) वैतरणा उर्जा क्रेंद्रातून विदयुत पुरवठा होतो. कच्च्या मालाची उपलब्धता आणि स्वस्त मजूर आजूबाजूच्या क्षेत्रातून याठिकाणी होत असते. मुंबई बंदर हे सहज जोडण्यासारखे आहे.
उंद्योगधंदे
(१) बिडी (२) चामडी उदयोग (३) विमान (४) तांब्याची भांडी (५) नायलॉन (६) नोटा व नाणी (७) बॅगा इ.
(६) कोल्हापूर औद्योगिक विभाग
औद्योगिक क्रेंद्र
1) कोल्हापूर, शिरोली, कसबा, बावडा, गोकुळ, शिरगाव
2) या विभागातील औद्योगिक विकासाची मुख्य घटक खालील प्रमाणे
3) कच्च्या मालाची उलपब्धता आणि सभोतालच्या परिसरातून स्वस्त मजूर पुरवठा.
4) माननीय छत्रपती शाहू महाराज जे येथील राजे होते त्यानी या क्षेत्रात औद्योगिकरणाच्या विकासासाठी प्रोत्साहन दिले.
5) राधानगरी आणि कोयना ऊर्जा क्रेंद्रतून विजेचा पुरवठा होतो.
कोल्हापूर हे कर्नाटक आणि गोव्याच्या जवळ आहे. हे मध्यवती शहर आहे म्हणूनच वाहतूकीचे रस्ते येथे एकत्र येतात.
उद्योगधंदे
(१) कोल्हापूरी चप्पला (२) कोल्हापूरी साज (एक विशिष्ट प्रकारचा दागिना) (३) सिंमेट पाईप (४) तेल मशिनी
(५) कापड उद्योग (६) साखर (७) शेतीची अवजारे (८) खाद्य तेल (९) मशिनरी (१०) दुध आणि दुग्धजन्य पदार्थ
(७) सोलापूर औद्योगिक विभाग
औद्योगिक क्रेंद्र
सोलापूर या विभागातील उद्योगधंद्याच्या विकासासाचे मुख्य घटक खालीलप्रमाणे –
1) क्रेंद्रीय स्थान -मध्यवर्ती स्थान
2) सभोवतालच्या विभागातून कच्च्या मालाची उपलब्धतता कुशल आणि अकुशल कामगाराची अतिशय स्वस्त दरात सभोवतालच्या परिसरातून उपलब्धतता
उद्योगधंदे
(१) कापूस (२ ) पायमोजे (३) दुध (४) शेतीची अवजारे (५) प्लास्टिक (६) विद्युत उपकरणे इत्यादी